बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

गुंतता ह्रदथ हे..!! भाग 5



  भाग 5

गुंतता ह्रदथ हे


तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस  त्या उपसून नाही टाकू शकतं.


                               रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या  निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार?  खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्तीला काय सांगायचं? सांगायला काहीही सांगू पण तिला ते पडणारं का?


                             सुरजनं सांगितलं होतं. रेवा अश्या चिखलात फसत गेली.ती आता त्यातनू बाहेर नाही निघणारं.  जिथं जाऊन माणूस पडतो तिथचं तो आनंद शोधत राहतो. सुखलालूप असाते माणूस. तिच्या विषयी जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा प्रचंड कणव वाटला होता त्याला. कधी कधी कणव पाझरण्या पलिकड आपण काहीचं करू शकत नाहीत.आज त्याचं रूपात ती भेटली. रेवाला त्याचं काहीचं वाटतं नाही. आपण कोणत्या रूपात भेटतो आहोत याचा थोडा पण संकोच तिला वाटला नाही. अश्या बाया लाज नाकाला गुंडाळून आपल्या अब्रूचं लक्रत वेशीला टांगून टाकतात.


               आपल्याला ओळखून ही ती जवळ आली. कसं बिनधास्त बोलली. आपण अश्या एका पुरूषासोबत अहोत. नातं या जगाला सांगू शकत नाहीत. ते नातं आपण ते मिरवू शकत नाहीत. रेवा थोडी पण संकोचली नाही. आपल्या समोर ती त्या पुरूषासोबत होती.काहीचं का नातं नव्हत तिचं नि आपलं? जे शरीर अनेकदा कुशीत घेतलं, कुरवाळलं. ते आज कुणाच्या तरी हातात होतं. काही दिवसापूर्वी फकत जे आपलं होतं. ते आता कुणाचं ही होऊ शकतं. ती असं कसं स्वत:च्या देहाला सार्वजनिक करू शकते? शरीर असं भाडयानं देतात या बाया पण त्यांच मनाचं काय?खरचं तिचं मन कुणात गुंतल असेल? आपण तिच्या सोबत लग्न करायाला हवं होतं का? छे..!! ते कसं शक्यं होतं? तिचं शरीर सोकलं होतं.चटावली होती ती. एका पुरूषासोबत तिला राहणं शक्यं नवहतं. पती व पत्नीचं नात अतुट असतं. सात जन्मं त्यांचा चिरयोग  असतो. अश्या बायाना ते कसं शक्यं? काही पुरूषांना तरी ते शक्यं का? आपण आणि रेवा.काही दिवासाचं तरी नातं होतच ना? ते नातं तुटुन जाऊ शकतं पण जे होतं ते मनावरल कसं पुसून टाकायचं? खर तर निलेशला त्या माणसाचा फार राग आला होता. आपल्या पैशाच्या जोरावर तो रेवाला असं उपभोगतोय. ती पैशाला बळी पडतेय. श्रीमंती असं माणसाला विकत नाही घेऊ शकतं. काही मानवी मूल्यं वगैरे काही आहे की नाही? असल्याचं भयंकर वैश्विक चिंता त्याच्या मनात दाटून आल्या.


                    आपलं नि रेवाचं जसं काही नात. संबध होतं. तसचं तृप्तीच पण असतील काय कुणासोबत? तृप्तीचं सोंदर्यं अनेक पुरूषांना खुणावत. रस्त्यानं चालतानाचं ते लक्षात येतं. अनेक नजरा रेंगाळताततिच्यावर. तिनं ही आपलं सौंदर्य व तारूण्य असचं कुणाच्या हवाली केल नसेल ना? मानानं खरचं ती आपल्यावर प्रेम करत असेल का? मंगळसूत्रं गळयात घातलं की नव-यावर प्रेम जडतचं असेल असं नाही. लग्नं, लग्नं संस्कार ही एक तडजोडचं असेल ना? संशायाचं व्हायरस त्याचा मेंदू पोखरू लागले.


                        तृप्ती आपली बायको. कुणी तिच्याकडं पाहीलं तरी आपल्याला सहनं होत नाही. तृप्ती फक्त आपली नि आपली असावी असं वाटतं.  ती दुस-याची होणं शक्यं नाही. ते आपण सहन ही करू शकत नाहीत. त्या दिवशी तिनं  त्या मुलाकडं पाहीलं तर आपण चक्क तिला मारलं.तृप्ती एक स्त्री आहे आपल्या आयुष्यात आलेली. रेवा ही एक स्त्रीच आहे आयुष्यात आलेली. दोघी आपल्या आयुष्यात आल्या. त्यांचे आयुष्यात येण्याचे मार्ग भले वेगळे असतील पण त्या आपल्याचं  आहेत ना? तृप्ती आपलीचं आहे. गळयात मंगळसूत्रं आपलं.मगळसूत्रं हे मालकी हक्काचां शिक्का असेल का? आपल्या संस्कृतीमध्ये त्याला फार छान आहे. सौभाग्याचं लेणं. आपलं सौभाग्याचं लेणं गर्वांन फिरवत अनेक स्त्रीया वावरतात. अनेक मगंळ सूत्र घालून ही. आपल्या पुरूषाशी प्रमाणिक नाही राहत. उगीचं त्याला  अनेक बायांची नावं आठवू लागली.


                     रेवा आज मात्रं कुणाची ही होऊ शकते. रेवा  कुणाची बायको झाली असती तर बरं झालं असतं. चक्क.. कॉलगर्लं… रांङ.निलेश असं सारं आठवत असताना तृप्ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहीली हे पण त्याच्या लक्षात नाही आलं.


“निलेश, बरं नाही का तुला?” तृप्तीनं काळजीच्या  स्वरात विचारलं. तृप्तीच्या मनात प्रश्न दुसरेच होते पण तिनं ते नाही विचारले. तिला ते विचारयचं ही नव्हतं. मनात जे वाटतं ते सारचं आपण विचारू नाही शकत. काही तरी बोलावं म्हणून ती बोलली.


“तसं काही नाही. आय ॲम ओके.” तो दचकला. सावध झाला. त्याच्या मनात काय चाललं हे थोडचं तृप्तीला कळणारं होतं.


“मग का उभा आहेस असा? आवर ना फ्रेश हो.”तृप्तीनं त्याचा हात हातात घेतं म्हटलं. निलेशनं तिच्याकडं पाहीलं.मोकळे सोडलेले केस.चॉकल्टी कलरचा गाऊन.. अंधारात ही ठळक लक्षात यावा इतका गोरा रंग.अंधारात गोरा रंग..नि चॉकलेटी कलर कसलं जबरदस्त कॉब्मीनेशन असतं. कुणा ही पुरूषाचं भानं हरपून जावं इतकी सेक्सी दिसतं होती तृप्ती. निलेशचं मन कुठं ठीक होतं. अचानक झालेल्या स्पर्शानं तो भानावर आला.तिच्या डोळयात पाहीलं. ती कुशीत शिरली.तिचा तो मलमली उबदार स्पर्श ही त्याचं भानं हरपवू शकला नाही.


“तृप्ती, प्लीज. अस एकटचं राहू दे काही वेळ मला.” तृप्तीच्या डोळयात खोल पहात तो बोलला. रेवा नं तृप्ती या दोघीची तुलना त्याचं मन करू लागलं.रेवा असं कधी शांत कुशीत नाही शिरली.ती आदळायची येऊन चक्क अंगावर. तिला हवं ती ओरबडून घ्यायाची. तृप्तीचं तसं नाही. ती कसं अलगद उलगडत जाते. फुलांच्या पाकळया अपोआप उमलाव्यात तसं. त्यानं तृप्तीला हातानं अलगद थोडसं थोपवलं.


“पण का? आपली एकत्रं यायची वेळ झालीय आता?”


“चूप.तू शांत बसं.” त्यानं तिला झिडकारलं.


“असं का करतोस? एवढा का डिस्टर्बंस तू?”


“ऐ, चूप. काही डिस्टब्र वगैरे नाही.प्लीज थोड एकटं राहयचं मला.”


“निलेश, रात्र झालीये. मी नाही सोडणारं तुला एकटं.”


“का?


“का म्हणजे.. तू नवरा आहेस माझा.असं कसं सोडीनं?”ती त्याच्या अधिक जवळ जात बोलली.मनानं भरकटलेल्या आपल्या नव-याला आपलसं करण्यासाठी अजून दुसरं ती काय करू शकत होती?


“तृप्ती, खरचं आज मूड खराब माझा.”


“मूड खराब..? तू बोलतोस हे? अशी मी समोर आलेली. रात्र ही अबोल थोडी. चांदणं.. हया चांदणया…तुलाचं काहीच वाटत नाही.तुझा मूड चांगला करण्यासाठी मला अजून काय करावं लागेल?”


“तू शांत झोपलीस तरी पुरेसं आहे.” निलेशनं वैतागून म्हणला.


“मला तुझ्या कुशीत झोपायचं. एकटं झोपायची सवय मोडली माझी आता.”


”प्लीज,तृप्ती.“


“असं कोण ती तुझी? तुझा मूड खराब केलाय?”


“तशी कुणीचं नाही. फक्तं जीव तुटतो तिच्यासाठी.”


“निलेश, कॉलगर्लं ना ती?तिच्यासाठी जीव तुटतोय तुझा?”


“अग, तसा नाही जीव तुटतं?”


“मग कसा?


“कॉलगर्ल माणसं नसतात. परीस्थिती फेकते माणसांना त्या किचडंमध्ये. रेवा एक हुशार नि कर्तबगार मुलगी होती. आज कोण त्या रूपात मला तिला पहावं वाटलं. अशी भेटायाला नको होती ती. वाईट मला ती भेटल्याचं नाही वाटतं ती तुझ्यासमार येऊन बिनधास्तं भेटलीयाचं  दु:ख झालंय.तिला काहीचं वाटलं नाही. ती खुशाल येउन भेटली मला. थोडा पण संकोच नाही वाटला तिला.”


“असं काय  विचार करतोस? धंदा करतेय ती. धंदयात सारेच पुरूष तिचं कस्टमरचं  आहेत की. सा-याकडचं ती एक कसटमर  महणून पाहणारं ना?तुझ्या वर्गात असली म्हणून काय झालं?”


“तृप्ती असं काही कसं काय बोलतेस?”


“ती अशी एकटीचं कॉल गर्ल नाहीये. अश्या हजारो बायका आहेत.सभ्येतचा बुरखा पांघरूण.अंधारात नागडया होणा-या.त्यातं काय एवढं?निलेश धंदा तो. प्रत्येक धंदयाच्या काही गरजा असतात. रांडाना लाजून नसतं जमत. ज्या जास्तं लाजा  सोडतात त्यांना.. जास्तं भांव  असतो व जास्तं मागणी पण असते.”


“तृप्ती…???” तो रागवला होता. चिडला होता. अजून जर तृप् काही बोली आसती तर त्यानं तिला मारलं ही असतं.


“पण तू इतका का इमोशनल झालास? ह्रदय तर गुंतलं नाही तिच्यात?” तृप्ती खटयाळ हासली.


“तृप्ती..?” असं म्हणला.पुढ झेपावला. तृप्तीला मिठीत घेतलं. त्यानं सा-याचं गोष्टीला टर्नं दिला.


“आता माझं.. ह्रदय फकत.. इथं गुतंल.”तिला आपल्या छातीशी कवटाळतं निलेश बोलला.तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी मनात असंख्यं प्रश्न उभे होते. निलेशच्या मिठीत शरीर होत. मन थोडचं कुणाला मिठीत घेता येतं? रेवाचं नि निलेशचे नेमके संबध नेमके कसे असतील? रेवा हे नाव खरं असेल की धारण केंलेले नाव असेल? आसल्या बायांची खोटी नावं असतात. पिंकी.गुडडी.इला,सोनी, मोनी.नावातून त्यांची वय कमी असावेत असा भास व्हावा. आपलं वय  नि ओळख लपवण्यासाठी  असं नाव धारण करतात आसल्या बाया. रेवाचं ही तसचं तर नसेल ना? तृप्तीच्या प्रश्नाला काहीचं अर्थ नव्हता. त्यातला एक ही प्रश्न ती विचारू शकली नाही. पुन्हा ते काहीचं बोलले नाहीत. त्यांचे श्वासचं बरं काही बोलत राहीले आपसांत.


 


 


                          आज तृप्ती प्रसन्न होती. निलेश आज एका कॉन्फरन्ससाठी जात होता. त्याला लवकर निघावं लागणारं होतं. त्यानं आवरायाला हवं होतं पण तो अजून ही लॅपटॉपवरचं होता.लवकर जायचं म्हणजे लवकर आवरायाला हवं. उठून नुसता लॅपटॉपवर बसला होता. लेटं झालं की तो नुसता चीड चीड करतो. तृप्ती त्याला हासून उठू लागली. तर त्याचा मूड रोंमाटीक झाला. सकाळीचं आठ ही वेळ काही रोंमाटीक होण्याची वेळ नाही. सकाळी सकाळी बायांची कसली धांदल  उडते. नव-यानं त्याचं फारसं काही देणं घंणं नसतं. निलेशनं लगेच तिला जवळ ओढलं.तिनं खरचं त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. ते बंध रेशमाचे..!! सुटता सुटेनात.


                  बाबांच्या औषधांचा वेळ होती. आईच्या पूजेची. त्यां दोंघानी सारं हातात हवं असतं. सारी कामं तृप्तीची वाट पहात पडली होती. निलेशचा रोंमांटिक मूड होता.त्याच्या तावडीतन सुटण्यासाठी ती प्रयत्न करत असतानाचं तिचा फोन वाजला.निलेशच्या मिठीतून सुटायला तिला हे कारण पुरेसं होतं.ती धावतचं किचन मध्ये आली. फोन रिस्व्हं केला. श्रेयचा फोन होता.श्रेयानं इतक्या सकाळी फोन का करावा? ती असेल फ्री पण तृप्तीला  कुठं उसंत होती. नोकरी करणा-या बायाचं तेवढं बर असतं. घर कामाला बाया लावता येता. घरच्याच फार तगादा नसतो. त्या कमवत्या असतात.श्रेया असेल निंवात… ऑफीसला दांडी सुध्दा  असू शकते तिची.


“हॅलो,गूड मॉर्निंग.. तृप्ती.”


“मॉर्निंग टू यू. थँक्सं. आज एवढया सकाळी फोन?”


“तू,फ्रीस ना पण?”


“मी कसली फ्री? ते शक्यं तरी का या जन्मी.”


“एवढं काय चिडतेस?”


“मी का चिडू? तुझ्यावर नाहीच नाही. निलेशला कॉन्फश्रन्साला जायचं. तो अजून ही उठतं नाही.”


“ त्याला जायचं ना? तू का एवढं टेन्शनं घेतेस? त्याचं त्याला कळू नाही का?”


“ तुला  माहीत नाही. लेट झालं की नुसता चिड चिड करतो.”


“ तुमचं चलू दया. तो नवरा. तू बायको. आम्हला  तुला फक्त थँक्यू म्हणायच ग.”


“ अग टाक ना म्हणून मग? त्यासाठी का आता मुहूर्त पाहणारेस का? असं काय केलं मी. तू थँक्यू म्हणावस असं?”


“अग,मी नाही म्हणणार? आदीला मानायचेत तुझे आभार.”


“आदी..!! कसा तो आता?” अश्चर्यानतिचा चेहरा फुलून आला.


“घरी आलाय तो रात्री आमच्या. खर तरं त्याची रात्रीचं इच्छा होती तुझे आभार मानायची.”


“मग?


“मग काय? टाळलं मी. रात्रीचं दहा वाजता ही काय वेळ का बायकांना फोन करायची? रात्री बायका फक्त नव-याच्या असतात.”


“ गप चावट कुठली.”


“मी पण एका नव-याची बायको. यात का नवीन आपल्याला?   आदिला काय काय कळणार? मासूम ना तो अजून. त्याचं लगन नाही झालं अजून.”


“लग्न न झालेली पुरूष्‍ मासूम असतात?” तृप्ती फोनवर बोलत होती. तेवढयात निलेश मागून आला. त्यांन चक्क मिठीत घेतलं नि म्हणला, “लग्न न झालेली पुरूषं मासूम असतात नि लग्न झालेली खडूस. असचं ना?” तृप्नं त्याला खूणानेच चूप राहण्याचा इशारा केला. निलेश गप राहणं एवढं सोप नव्हत. त्यानं एक गुलाबी ओरखडातिच्या उघडया पाठीवर ओढला. तशी ती  शहारून आली. नकळतच शब्दतिच्य तोंडातून बाहेर पडला. ‘आई ग?’


“ का ग? काय झालं?”


“ काय नाही?मांजर आलं किचनमध्ये.”


“ मांजर की बोका?


“बोका.. लांब लांब मिश्यावाला.. “  तृप्ती त्याच्या मिश्यावरून हात फिरवत म्हणाली.  आता हे तर निलेशला  चँलेजच होतं. त्याला थोपवणं तृप्तीला कुठं शकयं होतं?


“श्रेया, मी तुल पुन्हा कॉ करू का?”


“अग, आदिला तर बोल ना?”


“ऐक ना? निलेशला उशीर होतोय. मी कॉल करते ना नंतर. बाय.बाय..”  तृप्तीनं फोन कट केला. फोन चांगला कट झालाय याची खात्री केली. कट करावचं लागला. फोन वर जर आदि बोलू लागला आसता तर? निलेशला लगेच कळलं  असत. तृप्तीच्या पोटात प्रचंड भितीचा गोळा उठला होता.तिनं त्यातून ही स्वत:ला सावरलं.


“निलेश तुला काही कळेल का नाही? श्रेयाला सारं कळलं असेलं.”


“त्यात काय एवढं? मी कुठं काय केल?नवराय मी तुझा.”


“नवरा. म्हणून काय….?” पुढील शब्द तृप्ती उच्चारू नाही शकली. कसं उच्चारता येतील?  लीप लॉक केलं होते निलेशन. श्वासांचा आवाज व गती ही वाढली होती काही क्षंण.तिनं निलेशला पटापटा आवरून दिलं.त्याला बाय करूनचं ती घरात आली. 


बाबा पेपर वाचत बसले होते. आई ..देवळात गेल्या होत्या. निलेश एकदाचा गेला.तिला रिलॅक्स वाटलं.बरं झालं आपण फोन कट केला. आदि कडे फोन दिला आसता तर? निलेशनं तयाचा आवाज ऐकला आसता तर? त्या कल्पानानी सुध्दा घाम फुटला होता.तिनं तो पदरानं पुसला.श्रेयाला पण काही कळत की नाही. असा कशाला फोन करायचा? एक चांगल झालं आदि. सुधारलाय.श्रेयानं पुन्हा कॉल केला नाही हे ही बरं झालं. आदिच्य प्रकृतीत सुधारणा झाली.तो थँक्स म्हणू शकणारं ही बातमीतिच्या मनाला सुखावून गेली. तिच्या डोळयासमोरून  आदि हालत नव्हता. कारूण्याचं अमृत कण तिच्या मनात जमा होऊ लागले होते. आता शांत बसण शक्यं नव्हतं.तिनं फोन हातात घेतला.


आदिचा मेसेज होता.


( पुढील भाग लवकरचं.)


सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

मराठी साहित्य संमेलन: ‘आम्ही कसे घडलो’ की ‘आम्ही कसे बिघडलो’?

मराठी साहित्य संमेलन हे साहित्य, विचार आणि नव्या दृष्टिकोनांचा मिलाफ असतो. दरवर्षी यात वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन होते. यंदाच्या संमेलनात ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर चर्चा सुरू असताना, नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे संमेलनाचा रोखच बदलला. ही चर्चा ‘आम्ही कसे बिघडलो’ याकडे वळली आणि साहित्यसंमेलनाला अनपेक्षितपणे राजकीय वळण लागले.

Nilam Gore




साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश आणि त्याला मिळालेलं वळण


साहित्य संमेलन हे नेहमीच विचारवंत, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचा मंच राहिला आहे. साहित्य, समाज आणि संस्कृती यावर प्रगल्भ चर्चा व्हावी, नव्या संकल्पना समोर याव्यात आणि विचारांना चालना मिळावी, हाच संमेलनाचा मूळ हेतू असतो. मात्र, यंदा झालेल्या चर्चेने या संमेलनाचे स्वरूप बदलल्याचे जाणवले.


नीलम गोऱ्हे यांनी ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर बोलताना शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर टीका केली. परिणामी, एका साहित्यिक चर्चेचे राजकीय कुरघोडीत रूपांतर झाले.


नीलम गोऱ्हे यांची भूमिका आणि उद्धव ठाकरेंवरील आरोप


नीलम गोऱ्हे या अनेक वर्षे शिवसेनेशी जोडलेल्या होत्या. त्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापतीही राहिल्या आहेत. मात्र, पक्षातील गोंधळ आणि मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

      साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी मांडलेली भूमिका पाहता, चर्चा साहित्याच्या प्रगतीपेक्षा राजकीय नेतृत्वाच्या अपयशावर जास्त केंद्रित झाली.संमेलनाचा मूळ हेतू विचारात घेतला तर ही बाब खटकणारी होती.मराठी साहित्य संमेलन हे केवळ राजकीय व्यासपीठ नाही, ते साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चर्चांसाठी प्रसिद्ध आहे. तसचं तिथे घडलं पाहिजे.आपल्या राजकीय हितासाठी मराठी साहित्य  संमेलनासाठी व्यासपीठ वापरणं एकदम चुकीचे आहे ती नियम गो-हे यांनी केली. एकंदरीतच राजकारणातील लोकांचा सहभाग  दिवसेंदिवस  वाढतो आहे.मात्र,जकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे साहित्य संमेलन राजकीय प्रचाराचे साधन होऊ लागले आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होतो. साहित्यरसिकांना चीड पण येत आहे.साहित्य संमेलनाची राजकीय मालकी वाढते आहे का?

गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनामध्ये राजकीय वाद वाढताना दिसत आहेत.काही वर्षांपूर्वी संमेलनाच्या अध्यक्षपदावरूनही मोठे वाद झाले होते.साहित्य संमेलनात वेगवेगळ्या राजकीय गटांचे प्रभाव वाढत चालले आहेत.विचारमंथन आणि साहित्यिक चर्चा बाजूला पडून राजकीय विचारांचे समर्थन किंवा टीका करण्यावर अधिक भर दिला जात आहे.साहित्य संमेलनाचा पुढील वाटचाल कोणत्या दिशेने जाईल? राजकरणाचा आखाडां जर संमेलन बनवू लागले तर काय करायचं? संमेलनाने साहित्याच्या मुळ उद्देशावर लक्ष केंद्रित करायला हवे. राजकीय चर्चांमुळे संमेलनाची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. मराठी साहित्य आणि त्याच्या भविष्यासाठी संमेलनाला पुन्हा साहित्यिक चौकट परत मिळणे आवश्यक आहे. राजकीय हस्तक्षेपांपासून मुक्त होऊन, विचारस्वातंत्र्य आणि साहित्याच्या समृद्धीवर भर द्यायला हवा.संमेलन ‘विचारमंथनाचे व्यासपीठ’ राहील की ‘राजकीय प्रचाराचे साधन बनेल हा येणारा काळचं या प्रश्नाचं उत्तर देईल.‘आम्ही कसे घडलो’ या चर्चेने खरेतर ‘आम्ही कसे बिघडलो’ हेच दाखवून दिले.


     साहित्य संमेलन राजकीय कुरघोडींसाठी वापरले जाऊ नये, हे लक्षात घेतले पाहिजे. भविष्यात साहित्य संमेलन हे साहित्याच्या विचारमंथनासाठीच राहावे, अन्यथा ते राजकीय आखाडा बनण्याचा धोका आहे.


– शब्दगंधा टीम




शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

फुटलेला पेपर आणि राजू - मराठी कथा

 फुटलेला पेपर आणि राजू

जालना जिल्ह्यातील एका शाळेत, दहावीचा गणिताचा पेपर फुटला.बातमी वा-यासारखी पसरली आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक आली. कोण कुठून पेपर मिळवतोय, याचा शोध सुरू झाला पण राजू मात्र या सगळ्यापासून अलिप्त होता.राजू अभ्यासू मुलगा होता.त्याला लायकीच्या बळावर पास व्हायचं होतं पण त्याच्या समोर मराठीचा फुटलेला पेपर उभा होता.रडका,थोडासा चिंतेत आणि काहीसावैतागलेला.त्याचा अवतार फारच कळा गेलेला होता.रडून रडून डोळे सुजले होते. हा आपल्याकडे का आला आहे हे राजूला कुठं नव्हतं.

"राजू, माझं ऐकशील का रे?" पेपर डोळे पुसतं बोलला.

"अरे, तू बोलतोस?म्हणजे तू बोलू शकतोस? आणि इतका दुःखी का आहेस?फुटलास तूच आणि रडतोस  पण तुच.कमाल बुवा तुझी..!!" राजू त्याच्याकडे राग राग पहात बोलला.त्याला बातमी आल्यापासूनच फुटलेल्या पेपरचा  राग आला होता.

"मी काय स्वतःहून फुटलो का रे? मलाही कुणीतरी फोडलंच असेल ना?कुणी तरी फोडल्या शिवाय काहीच फुटतं नाही रे. साधं लाॅजिक हे.आता माझ्यावर सगळे ओरडतायत.खासदार,आमदार फुटतात, पक्ष ही फुटतात, लोकही फुटतात... मग मीच का दोषी? फक्त मीच फुटलो का या जगात? सारेचं गद्दार असतात रे." पेपर काकुळतीला  येऊन बोलत होता.

"खरंच रे, पण तुझ्यामुळे किती जण नक्कल करून पास होतील,आणि किती जण मेहनत करूनही नापास होतील, याचा विचार केलास का?परीक्षाला काही अर्थच राहत नाही ना? गद्दारी करणं चांगली नाही रे." राजूला आता पाठ केलेले सुविचार  सांगण्याची  तलप आली होती. तो बडबडू लागला.

"का रे तुम्हाला गद्दार सरकारं चालतात.आमदार, खासदार  फोडलेला चालतात मग माझाच का एवढा बोभाटा?" पेपर जरा चिडला होता.

" ते राजकारण असतं.ते तसचं खेळणार रे.तू अनेकांच्या भविष्याशी खेळतोस रे." समजावणीच्या सुरात राजू बोलला. राजाचं खरं होतं. आता परिक्षेत असं राजकारण करणं कितपत योग्य?

 "अरे बाबा, मी कुणाला सांगतोय का कॉपी करायला? मलाच फोडतात सारे.तुमचे शिक्षक, पालक,अधिकारी सगळे हात धुवून माझ्या मागे औ. माझ्यावर माया दाखवणारा कुणीच नाही. मला,तरी कुणी तरी माणसं फोडतात ना? मी काय एकटाच फुटतो का? हल्ली कुठल्या ही परीक्षेचे पेपर सहज फुटतात.पण एवढा बोभाटा नाही होत."

"आता फुटल्यावर बोभाटाचं होणार ना?"

"अशी परिक्षा आहे का या महाराष्ट्रात तिचा पेपर फुटतात नाही. जी मेन असेल नाहीतर  नीट असेल यांचे पण पेपर फुटतातचं की.खरचं,तूच सांग बरं पेपर नाही फुटला तर पोरं पास कशी होणार?"

राजू गप्प बसला.त्याला पेपरचं दुःख कळत होतं. पण त्याहीपेक्षा,आपल्या समाजाचं वास्तव त्याच्या लक्षात आलं होतं.पेपर बिचारा आपण होऊन कसा फुटेल?माणसंच फोडतात त्याला. हेच सत्यं आहे हे राजूला करून चुकलं होतं.

"पोरं पास तर झाली पाहिजेत ना?नाही अभ्यास करीत पोरं.तुम्हाला सां-यानांच पुळका येतो पोरांचा.मग फोडतात तुम्ही.मी काय करणार? हतबल करतात,मला सारे." पेपर त्याची करूण कहानी सांगत सुटला.

"माणसं अशीच का वागला लागलीत हल्ली हेच मला कळेना?"

" माणसाचं नको विचारू.फुटल्यावर काही आम्ही एन्जॉय नाही करतं ही गद्दारी."

"ते आमदार  तर बियर पिऊन भन्नाट नाचले होते."

" त्या नाचणा-या आमदार वर नको जाऊ. नाचत असले तरी बुडाला त्यांच्या आग लागली असते.सारी नाटकं असत्यात त्यांची."

"असं लगेच का फोडतात तुला.पहिल्याच दिवशी असं का फुटलास रे." 



"पोरं हुशार करायची पण असतात.परिक्षा पण कडक हव्या असतात. नापासांची चिंता असते सरकारला.मग फुटावंच लागतं आम्हाला.सरकारचं टेन्शन असत,यार.!!!आम्हाला जरी काळीज नसलं तरी वाटत काही तरी करावं या बिच्चा-या पोरांसाठी.सरकार साठी अधिकारी ही झक मारतात आणि आळ आमच्यावर घेतात."पेपरचा चेहरा लालबुंद झाला होता.

 "समाज असा वागतोय की,कुणालातरी फोडायचं आणि त्यावर राजकारण करायचं.मग ते परीक्षा असो राजकारण असो, की घरगुती भांडणं..!! जाऊ दे.तू मला का सांगतोस हे माझीशकाहीचं तक्रार  नाही यार." राजू सारवासारवी करत बोलला.

" राजू, तू तरी अभ्यास कर.फोडाफोडीचा रोगच झालाय माणसाला." तो तरा तरा निघून गेला.

इतक्यात राजू घाबरून जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम होता.त्याने उशाशी ठेवलेला अभ्यासाचा पुस्तक उचललं आणि पुटपुटला बिच्चारा पेपर...!!!

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

"छावा (Chaava) मराठी चित्रपट – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय!"



छावा, चित्रपट तुम्ही पाहिलायं का? 
याचं उत्तर तुमचं 'नाही' असं असेल तर
हे काय हे जिणं तुमचं..!!
Chaava Movie Sambhaji Maharaj Son Of Shivaji Maharaj Vicky Kaushal










पहा, ना मग उशीर कसला करताय? तुम्हाला तो पाहायचा तर आहेच ना? मग बघा ना लवकर...!! उशीर का करता..?
 हे पहा तो थिएटरला जाऊन पाहयचा आहे.कुठं ही आणि कसा ही पाहयचा नाही.
मज्जा नाही येणार?
साॅरी..!! छावा चित्रपटाची मज्जा नाही घेऊ शकत कुणीचं.आपलं काळिज कुणी होरपळून काढताना कुणी सिनेमा एन्जॉय करू शकत का? ते शक्य नाही.
धडपडणारे जर ह्रदय तुम्हाला असेल तर तुम्ही न रडता तो चित्रपट पाहू नाही शकत.
काय म्हणता?
इतकं इमोशनल का होताय.साधा चित्रपट तो? फार तर तो छान जुळून आला आहे असं म्हणा.कलाकाराचं कौतुक करा फार तर. 
चित्रपट तो.एक कलाकृती म्हणूनच पहा ना? कुणाचं पात्र कसं रंगलय? हे सांगत बसा.आहो,रडताय काय तुम्ही? ही एक कलाकृतीची आहे याचं भान ठेवा.ते सारं सारं खोटं असतं.सारं रंगवलेलं असतं. चित्रपट गृहातचं
शिवगर्जना वगैरे .... हे फार अति होत हं...!!
खरं तुमचं.ते सारं रंगवलेलं आहे. मला माहिती ही आहे ते सारं खोटं घडतयं.इफेक्ट दिलेले सीनस् आहेत ते सारे.
सारं सारंचं खोटं पण आम्हाला खरं का वाटतयं सारं.आता आताचं घडतयं असं का वाटतयं सारं..?
विकी कौशल्य,ती रश्मिका ते सारे कलाकार आहेत हे का विसरलोत आम्ही. ते सारे खरचं वाटू लागलंय.
इतकं इमोशनल टच का होतोय?आमच्या मनाच्या पटलावर हे सारं चलचित्र पिढयानं पिढया कोरले गेलेले आहे त्यामुळे ही असेल कदाचित.
मराठ्यांचा इतिहासाचं रक्ताने लिहीला गेलेला आहे.कंकू पुसलं जाताना अनेकीच्या आश्रूंच्या ज्वाला झाल्यात...ठिणग्या उठल्यात.प्रत्येकीच्या पुसलेल्या कुंकूवाच्या,त्यागातून हे स्वराज्य आणि स्वाभिमानाचा यज्ञ पिढ्यान पिढया धुमसत राहिला आहे.
अजून ही धुमसतचं राहणार आहे. स्वराज्यासाठी प्राण तळहाती घेताना इथला प्रत्येक माणूसन् माणूस पेटला होता.
आमचा इतिहास ज्वलंत आहे.तो आम्हाला असाचं आमच्या छातीत पेटता ठेवायचा आहे. कुणीतरी राखेत धगधगत्या निखा-यावर फुंकर मारली.तो पुन्हा...रसरसून आला असेल का? असचं काही तरी घडते आहे हा चित्रपट पाहताना.एवढं नक्की...!!! प्लीज...!!! कुणी त्या इतिहासाचा काथ्याकूट पुन्हा नका करत बसू. त्या पुराव्याच्या संदर्भाच्या झंझळात नका इतिहास आम्हाला सांगत बसू.
शट अप..!!! 
आम्हाला असाचं हा धगधगता निखारा प्रत्येक काळजात धुमसतं ठेवायचा आहे. असाचं इतिहास आम्हाला हवा आहे. 
शपथ..!! या चित्रपटात इतिहासाचं जिवंत केला गेलाय आमचा.

Chaava Movie Sambhaji Maharaj









त्या निर्मात्याचा लयचं खिसा भरतोय.बाॅक्स ऑफिसवर तुफान राडा केलाय छावाने...!!
भरू दया की. पोटात दुखू देऊ नका.
सैराट सारखा एका लफड्याचा चित्रपट आपण डोक्यावर घेतला होता. हा तर आपला इतिहास आहे. 
मृत्यू ही जिथे शरण येतो.त्या वीराची ही गोष्टं.
नसानसात स्फुलिंग चेतवणारा इतिहास आहे हा..!!!.ही नशा,ही धूंदीच आम्हाला हवी आहे.
थँक्यू. !!! छावा टीम.


गुरुवार, २ जानेवारी, २०२५

महाभारत लाईव्ह: तुमची भूमिका काय? धर्म विरुद्ध अधर्माची लढाई!

Mahabharat-महाभारत Mahabharat Image

आज आता तुमच्या समोर महाभारत घडत आहे.
तुम्ही कुरुक्षेत्रावर  उभे आहात.ते सारं लाईव्ह  पहात आहात.
असं समजा.
जे घडतयं ते तुमच्या डोळयासमोर घडते आहे?
इमॅजिंग करा.
कल्पनाचं करायच्या आहेत तर भव्य दिव्य कराव्यात.त्यात कसली कंजूषी करता?त्याला कुठं पैसे लागतात?
एवढं महाभारत  घडते आहे तर तुम्ही  कुणाच्या बाजूनं आहातचं.
नाही कळलं? इझी ते.
कौरवांच्या की पांडवांच्या..?
धर्माच्या की अधर्माच्या?
काय म्हणता?
तुम्हाला धर्म  नि अधर्मचं  ठरवता येईना? 
आता कोण  कौरव? कोण पांडव? कोण श्रीकृष्ण? ते ठरवताच येईना.
त्याची काय मेथड असती काय? कमाल बुवा..!!
त्याची कसली मेथड भिंथडं यार?
आपण कोण आहोत हे ठरवा की फर्स्ट...? कोण आहात तुम्ही नक्की?
तुम्ही तिथं आहात म्हणजे तुमचा भी काही तरी रोल असेलचं ना? 
आपला रोल  ठरवता आलं की
महाभारत समजायला सोप जातं?
तुम्हाला पुढं सारं सहज ठरवता येऊ शकतं. नायक भी खलनायक ही? 
तुमचा मित्र  दुर्योधन ही असू शकतो किंवा सुदाम्याही..!! तुम्ही पांचली भी असू शकता किवा सुभद्रा ही?उत्तरा  किंवा कुंती ही...!!
अगदी तुम्ही कुणी ही असू शकता? नाही तर नुसतचं एखादं प्यादं....!!
कुणीच दिलं न घेतलेले. 
आंधळे धृतराष्ट्र ही...!!  किंवा संजय दिव्यदृष्टी असलेला...!! समजा ना स्वतःला काहीतरी.
काय म्हणता?
महाभारत इथं घडते आहे असं मी समजूच का?  
मग बसा बोंबलत? काही तरी समजावायचा लागेल ना? महाभारत  तर घडतेच आहे. तुम्ही काहीचं नाही ठरवलं तरी महाभारत  हे घडणारच आहे. अटळ असतं ते.



बुधवार, १ जानेवारी, २०२५

नविन वर्षाच्या शुभेच्छा व काळ पुरूष वगैरे

 आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष 2024 गेलं.वर्ष 2025 आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.काय घडलय?

New Year नविन वर्ष


उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.

फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आपल्या आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. मकाही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत.एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत. खर तरं या विश्वात आपण काहीचं करू शकत नाही.

       या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात.ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग भास- अभासाच्या हिंदोळयावरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.


    खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड नुसतं सरकतं असते.ते असेच सरकत राहणार आहे. पुढे मागे खालीवर असा देशाचा पसारा कुठं असतो अवकाशात?

गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आपलं आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.

काळ पुरूष  असतो की स्त्री? 

काळाला आपण जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं.बाय -बाय 2024 व वेल कम 2025 अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल-कम असं घसाफोड सुरुच असते.घराघरावर केलेली रोषणाई.चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात माणसं. का?

माणसाला बेधुंद होण्यासाठी काही तरी निमित्त  हवं असतं?

पिण्यासाठी तर ते नक्कीच  हवं असतं.

नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं.नवं वर्ष आलं की एकच जल्लोष होतो.


    नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल का? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल का? असं  काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही.कसूर करायची नसते.माणसं एखाद्या संज्ञेच्या संकल्पनेच्या किती प्रेमात पडतात,नाही?


आपण रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घराघरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते आपण पितो.आपल्याला नाचायचं असतं आपण नाचतो.आनंद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने करत असतो.निमित्त हवं असतं.

   तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं? 


      आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात.ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा,नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा...!!!

आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो.सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं? एक लाटं आली की ती सारं होत्याचं नव्हते करते.तसचं हे काळाच्या लाटेत  आपलं सारं  सारं या अनंत ब्रम्हांडांत मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं.दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?


आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू.आपलं आयुष्य आपणचं सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.

बोला सर्व जण,"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!! हॅप्पी न्यू इयर...!!


                                    परशुराम सोंडगे

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

तुमचा गाल आमची थप्पडं

 तुमचा गाल आमची थप्पडं

एकांकिका


मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!! 

'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती.

एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते.

आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता.

या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?,

तुमचा गाल आणि आमची थप्पड..!!

तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो.

थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा.

तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे.

एखादा पत्रकार तुम्हाला येऊन विचारू शकतो? आता कसं वाटतय? थप्पड  खाल्ल्यानंतर आपल्याला काय काय वाटू शकत हे याची आपली कल्पना करा.

आमचं एक सरं वर्गात मुलांना शिक्षा देण्यासाठी एक नामी युक्ती करतं.मुलींना मुलाच्या कानफटात मारायला लावतं. आता थप्पड  मारलीचं जाणार आहे हे तर नक्कीच  होतं.आमची एवढीचं अपेक्षा असे की एखाद्या सुंदर मुलीनं आमच्या कानफटात  मारावी.अनेकदा सुंदर मुली या नाजूक असतात.त्यांची थप्पड  म्हणजे गालावर फुलांचा मारा केल्यावाणी असे.कानामागे मुंग्या निघण्यापेक्षा गुदगुल्या होईत.

थप्पडं खाणं चांगलं नसलं तरी पण त्यात एक सुख दडलेलं असे पण हे सुख जास्त वेळ टिकत नसे. त्या गोब-या मऊ मऊ गालावर  सर एक सणसणीत  क आवाज काढणारी थप्पड  मारतं.दिवसाचं चांदण्या पाहण्याचा महत भाग्य ही आम्हाला भेटे.

 आम आदमीचा गाल फक्त थप्पड  खाण्यासाठी असतो.तुमच्यावर सत्ता गाजवणा-या सत्ताधीशासाठी तरी तुमच्या गो-या गोब-या गालाचा दुसरा काय उपयोग असू शकतो?

आता तुम्ही म्हणणार हे काय लावलं थप्पड  पुराणं?

आपले जे राजे,एकटं बाॅस,जंगलाचा शेअर,डाॅन अशी जे नाव धारण करून,आपणचं आपल्या उरावर बसण्यासाठी निवडून  दिले आहेत.त्यांच्या थप्पडा खाण्यासाठी तयार रहा.

थप्पड पे थप्पड  पडणारच आहेतं.

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

आपण सारे पागल ठरतो तेव्हा...!!!


संसद हे आपलं सर्वोच्च सभागृह आहे.भारतात  संसदेपेक्षा सर्वोच्च असं काही  ही नाही.असं मी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेलो आहे. नागरिकशास्त्र शिकवणारे आमचे शिक्षक भारी शिस्तीचे होते.ते आमचे हात फोडून काढत पण नागरिकाची सनद ,कर्तव्य व अधिकार असल्या गोष्टी पाठचं करून घेत असतं.
एखादा अधिकार आपण त्यांना  सांगितला की ते त्याचं कर्तव्यं विचारतं त्यांच म्हणणं स्पष्ट  असे अधिकार आणि कर्तव्य  हया नाण्याच्या दोन बाजू आहेत.नागरिक आपले अधिकार  मागतात पण कर्तव्य मात्र जाणूनबुजून विसरतात.सुजाण  नागरिक  तोच जे कर्तव्य  विसरत नाही.

                           आम्हास कर्तव्य  सांगता नाही आले की ते चड्डी ओली होई पर्यंत बेजरब मारत असतं.त्यावेळी  सुजाण आणि सजग पालकांच्या टोळया नसतं.त्यामुळे शिक्षकांना आवरायला कुणी नसे.शिक्षणात ही आंनदायी शिक्षण हा प्रकार  तेव्हा सुरू झालेला नव्हता.
जेव्हा मी इतिहासात हिटलर नाव ऐकलं तेव्हा पासून मी त्या सरांना हिटलर समजत असे. ते हिटलर सारखचं वागतं. दिसतं पण.
लोकशाहीच्या धडे देणा-या माणसांनी हिटलर असू नाही अशी माझी अपेक्षा असे पण माझ्या सारख्या गुलामांच्या मताला काहीच किंमत नसे.
बरं मला वाटतं ते तरी व्यक्त होण्याची हिम्मत  माझ्याकडे तरी कुठे होती?कुणाकडेच नव्हती.त्यामुळे गुलामाच्या अपेक्षेला काहीचं महत्व  नसतं.हे सत्य कळायला मला पन्नाशी गाठावी लागली.
नागरिकशास्त्रा शिकवणा-या हिटलरी शिक्षकामुळे मला लहानपणापासून  संसद या शब्दात विषयी कमालीची जिज्ञासा आणि  जिव्हाळा वाटतं आलेला आहे.
संसदेवर दोनदा हल्ले झाले होते तेव्हा पण मी फार भावूक झालो होतो.भावूक होण्यापेक्षा फार भयभीत  झालो होतो.संसदेवर ॲटक म्हणजे काय जोक्स काय? 
आपल्याला वाटतं किंवा कळतं हे सार तसचं असतं असं नाही.खरं तर फारचं भयंकर असतं कधी कधी.आपल्याला काहीचं कळतं ही नसतं. आपण पागल असतो याचा साक्षात्कार  काही घटना आपल्याला करून देतात.
कालपरवा जे संसदेमध्ये घडलं.ती अशीच एक देश वासियांना अक्कल शिकवणारी घटना होती. संसद हे सर्वोच्च  सभागृह  वगैरे काही नसतं. तो एक आखाडा असतो.कुस्त्या खेळायच्या असतात तिथं.झोंबाझोंबी खेळायच्या असतात.नाहीच समोरची गडी रेटले की महिलांना पुढे करायचं.पुढं किती गडी शटकरं असले तरी महिलांना काय करणार? कुणाच्या बांगडया फोडून तुम्ही काय पौरुषत्व  सिध्द करणार?
कसली चर्चा कसली! कसली अर्चा .!!
आज मला भयंकर राग आला आहे.
कुणाचा काय म्हणून विचारता ?त्या नागरिकशास्त्र  शिकवणा-या त्या आमच्या शिक्षकाचा. फुकटातचं त्यानं आमचं हात फोडलं.चड्ड्या ओल्या केल्या.
संसद अशी पण असते हे आम्हा पामराला कुणी शिकवलं नाही.
 हे बरोबर नाही.अध्यक्ष  महोदय...!!

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार

 ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार 








पुरस्कार राव,

हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य  सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस.

यार,तू लयचं लेट केलसं.

जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास.

हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली 

चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना?

काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!! 

तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं!

त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार?

आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच  असत्यात की.

क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना?

पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत?

ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून?

त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थोडी हौस असते? ते थोडचं तुला मिरवित बसणार आहेत.

ग्रेट ते ग्रेटचं...!! 

ऐवढं एक लयं झॅक झालयं बघ.तू कस तरी सरांना गाठलस.त्यांच्या गळयात पडलास.

बाबा, धन्य झालास तू.

नाहीतर तुझी काय कमी थू...!! थू ...!!!  सुरू नाही.आपलं भी स्टेटस राह्यलाय पाहिजे ना?

अशाचं ग्रेट माणसाच्या शोधात राहत जा.तुझी भी इज्जत  राहिल.

चांगल्या ग्रेट माणसाची संगत बरी असते.

माकडासोबत खेळतं बसल्यावर....तुझी तरी काय किमती राहणार?

      सर, साहित्यसेवेसाठी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.आपलं हार्दिक  अभिनंदन..!!

आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!


#साहित्यअकादमीपुरस्कार #सुधीररसाळ #मराठीसाहित्य

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

पुष्पा-2:- राडाच पण हवाहवासा..!!

पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!!



'पुष्पा-02 तुम्ही  पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर  आहे तो ..!!  नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग
'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?'
ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02  न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे.
अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं.
तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट  ओढता ,जेवण  करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो?
छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात.
पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य  करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..??
तुम्ही  मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला.
पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स  ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्दीत  तुम्ही  नाही? कसं वाटतयं तुम्हाला?
रेकॉर्ड  होत असताना आपला पण खारीचा वाटा पाहिजेना त्यातं..!!
बघा,ना एकदाचा पुष्पा-02
काय त्यात एवढं? असं काय विचारता?
'झूकेगा नही साला' असं म्हणतं  एक गावठी आडाणी उडाणटप्पू पुष्पराज आहे त्यातं.फारच बेधडक वागतोय तो.कधी कधी तो सटकतो पण.
तुमच्या आमच्या मनात असा एक हिरो दडलेला असतो.आपण त्याला दाबून ठेवलेले असते आपल्या आत. तोच उफाळून  येतोवर. तुटून पडतो तो समोरच्यावर... या व्यवस्थेवर
.!!
भौतिकशास्त्राचं सारे नियम झक मारतात त्याच्या पुढे..!! पिक्चरमध्ये रोमान्स भी सपक नाही दाळभातासारखा.पुळचाट..!! पुष्पराज हे असलं डेंजर माणूस आणि ती तसली त्याच्यावर जीव ओवाळून  टाकणारी त्याची ती फटाकडी श्रीवल्ली...!! काय अफलातून  पोट्टी यार...!! बालीवूडमधल्या सा-या नटया मिळमिळ वाटतात सा-या रश्मिका पुढे. ठेचा ती... !! नुसता झणझणीत..!!
झुकेगा नही साला म्हणतं भिडणारा प्रचंड महत्वाकांक्षी माणूस पुष्पराज बघा एकदाचा. तेवढचं रक्त थोडं फार गरम होतं काही वेळा पुरतं.
कुणा पुढं ही शेपट्या घालून गोंडा घोळत बसणारी माणसाची कुत्रे झालेली तर आपण रोजचं पहात आहोत.
काय म्हणता? त्या पुष्पराजची व श्रीवल्लीची जात कोणती आहे? इंटर कास्टं लफडं तर नाही ना ते..आपल्या सैराटमधील अर्ची आणि परश्या सारखं..?
डोंबल आमचं....!! घ्या आता. ते कुठं माहित मला?
हॅशटॅग्स तयार:

#Pushpa2Rocks
#झुकेगानहींसाला
#PushpaRajOnFire
#SrivalliForever
#RecordBreakingPushpa
#ActionKaBaap

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज अलकानंदा घुगे - आंधळे यां चा ' अर्धा कोयता ' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथ...