शनिवार, ५ एप्रिल, २०२५

खाजगी दवाखान्यांची लूट आणि सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी – एक सखोल विश्लेषण

 

dinanathmangeshkar hospital caryless
सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी
650662278344988579/8340148435986465463

माणुसकीचा आटलेला झरा: खाजगी दवाखान्यांची लूट, सरकारी रुग्णालयांची बेफिकिरी आणि आरोग्य व्यवस्थेतील विसंगती

Keywords (शोधशब्द): खाजगी दवाखान्यांची लूट, सरकारी रुग्णालय समस्या, वैद्यकीय भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्था विसंगती, डॉक्टरांचा गैरवर्तन, आरोग्य विमा फसवणूक, धर्मादायी रुग्णालय गैरव्यवहार, वैद्यकीय शिक्षण मूल्यशिक्षण


प्रस्तावना

अराेग्यसेवा ही मूलभूत गरज आहे.अराेग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात शासकीय रूग्णालय शासन चालवते.अनेक मोहिमा ही राबवते.ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय ही गैरसोयीची केंद्र झालेली असतात.तसेच सौजन्याची ऐशी की तैशी असते.त्यामुळे लोक खाजगी रुग्णालयाचा पर्याय निवडतात.आधार आणि विश्वास हवा असतो. धीर हवा असतो.खाजगी रूग्णालयात धीर विश्वास व उपचार सौजन्य सारं मिळते पण ते फार किमती असते.ते गोर गरिबांचे कंबरडे मोडणारे असते. अर्थात यात जर नामांकित रूग्णालय असतील तर त्यांचा ही तोरा काही औरचं असतो.

             अपुरे वैद्यकीय ज्ञान व योग्य उपचाराच्या आशेपोटी लोक गुमान त्यांच्या कंपाऊंडरचे, नर्स चे कसली थेरं सहन करतात. अनेक खाजगी दवाखान्यातून स्टार हा प्रशिक्षित नसतो. कमी पगारावर उपलब्ध असणारे ते गरजू पण अडाणी लोक ठेवतात.त्यांनाच जुजबी ट्रेनिंग देऊन काम चालवून घेतात. यावर सरकारचं काही ही नियंत्रण नसते. फीस मात्र भरमसाट घेतली जाते. कुठल्या ही रूग्णालयात जा.तुम्ही सावजचं असतात.सारे मिळून तुमची शिकार ते करणारच असतात.डाॅक्टर लोकांना काय समजतत,ते समजोत पण डाॅक्टरला लोक देव मानतात.मरणाच्या दारातून ते जीव परत आणतात.असा त्यावर विश्वास असतो. डाकरांच ल रुग्णाच्या खिश्यात.. !!!

                              तुम्ही शेतकरी,कष्टकरी असाल तर तुम्हाला ते उपचार करतील असं नाही.तुमची,अर्थीक कुवत तपासण्यासाठी ते तुम्हाला डिपॉझिट करायला सांगतील. तुम्ही ते करं शकला,तर हरकत नाही.नाही करू शकला तर तुम्हाला ते उपचार ही देणार नाहीत आणि सल्ला पण.... शासकीय रूग्णालयात डाॅक्टरांची बेफिकीर पावलो पावली पहावयास मिळते. त्याचं एक कारण असते.अनेक शासकीय सेवेतील डाॅक्टर खाजगी दवाखाने थाटून बसतात. अनेक ठिकाणी त्यांची कन्सल्टींग ही सुरू असते.शासकीय वेळेत त्यांना आपलं दुकानं चालवायचं असतं.राजरोसपणे ते असं करू शकतात. सर्रासपणे... शासनाचं कसलचं नियंत्रण नसते.असलं तरी सारं मॅनेज असते. पैसा कमविण्याच्या लालसेतून रुग्णांची लूट करण्याचा नवा बाजार उभा राहिला आहे. या लेखात आपण खाजगी दवाखान्यांतील लूट, सरकारी दवाखान्यांमधील ढिसाळ कारभार आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेतील विसंगती याविषयी तपशीलवार चर्चा करू. 


खाजगी दवाखान्यांत लूट का वाढते आहे?

1. दर नियंत्रणाचा अभाव

खाजगी दवाखान्यांमध्ये कोणतेही दर निश्चित नाहीत. प्रत्येक हॉस्पिटल आणि डॉक्टर स्वतःच्या सोयीनुसार शुल्क आकारतात. उदाहरणार्थ, मुंबईतील एका नामांकित खाजगी दवाखान्यात हृदय शस्त्रक्रियेचा खर्च ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत असतो, तर लहान शहरांमध्ये तो २ ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान असतो.ही असमानता रुग्णांसाठी आर्थिक संकट निर्माण करते. मरणाच्या भिती पोटी लोक जास्त खर्च करणार.त्यांची लूट होते.आपण सारे पहातो.इतकी विसंगती का?कोणत्याही प्रकारचे शुल्क नियंत्रण नसल्यामुळे हॉस्पिटल्स हवे तसे पैसे आकारतात. MRI, CT Scan, ICU, सर्जरीचे दर ठराविक नसल्याने रुग्ण आर्थिक संकटात सापडतो.

2. अनावश्यक चाचण्या आणि औषधे

रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठी अनेकदा अनावश्यक चाचण्या केल्या जातात. उदाहरणार्थ, एका रुग्णाला फक्त डोकेदुखी होती, पण डॉक्टरांनी त्याला MRI आणि CT Scan करण्याचा सल्ला दिला,ज्यामुळे १५,००० रुपयांचा अतिरिक्त खर्च आला. रुग्णाच्या मनात भिती निर्माण करून अशी लूट केली जाते. दवाखान्याची व कोर्टाची पायरी चढू नये असं लोक मानतात.आपल्या अयोग्य सेवेविषयी लोकांमध्ये प्रचंड भिती आहे.

फक्त भिती दाखवून रुग्णांना महागड्या चाचण्या आणि औषधांमध्ये अडकवले जाते. डॉक्टर आणि औषध कंपन्यांमधील करारामुळे ही साखळी अधिक बळकट झाली आहे.

3. आरोग्य विमा योजनांची गैरफायदा

विमा असलेल्या रुग्णांकडून बिल फुगवून आकारले जाते. हे हॉस्पिटल आणि विमा कंपन्यांमधील संगनमताचे उदाहरण आहे.आरोग्य विमा असलेल्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते.एका केस स्टडीमध्ये असे दिसून आले की, एका रुग्णालयाने १ लाख रुपयांचे बिल फुगवून २.५ लाख रुपये दाखवले, कारण रुग्णाच्या कुटुंबाकडे आरोग्य विमा होता.त विमा कंपन्यांशी ती एक लूटचं असते.रूग्ण ते देयक अदा करणार नाही याचा अर्थ कंपनीची लूट करायला हे मोकळे आहेत का? नामांकित आणि धर्मादायी रुग्णालये गरिबांची फसवणूक करतात. अनेक नामांकित रुग्णालये आणि तथाकथित धर्मादायी रुग्णालये सरकारी जमिनीवर आणि अनुदानावर उभारली जातात. मात्र, त्यांनी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता नसते. सौजन्य ही नसते.अनेकदा ते गरीबांना जागा शिल्लक नाही ही सबब सांगून अक्षरशः हाकलून देतात. उदाहरणार्थ, मुंबईतील एका प्रसिद्ध धर्मादायी रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या बेड्सवर उच्चभ्रू रुग्णांना भरमसाट शुल्क घेऊन दाखल केले होते.सरकारी मदतीवर उभे राहूनही हे रुग्णालये गरिबांची लूट करतात आणि केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांनाच प्राथमिकता देतात. 

औषध कंपन्यांशी साटेलोटे:

डॉक्टर आणि औषध कंपन्यांमधील साटेलोट्यामुळे अनावश्यक महागड्या औषधांची शिफारस केली जाते. २०१९ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ७०% डॉक्टर हे विशिष्ट औषध कंपन्यांच्या उत्पादनांना प्राधान्य देतात आणि त्याबदल्यात मोठे कमिशन घेतात.आपल्या,रूग्णालयात आपलंचं औषधाचे दुकान थाटतात.जास्त ओषधं विकली गेली की नफा आणि कमीशन ही वाढवून मिळते.कशासाठी पैशासाठी...!!! सेवे पेक्षा पैश्याचा महत्व दिले जात आहे. डॉक्टर समाजसेवक नसतात ते अव्वल धंदेवाईक असतात.समाज त्यांना समाजसेवकाचा किताब बहाल करतात. 

अप्रशिक्षीत न अनानुभवी स्टाफ

अनेक खाजगी दवाखान्यातून स्टा हा प्रशिक्षित नसतो. कमी पगारावर उपलब्ध असणारे ते गरजू पण अडाणी लोक असतात. डॉक्टरांना कमी खर्चात नोकर हवे असतात. अनेक डॉक्टर कामगारांच अर्थीक शेषण ही करतात. अप्रशिक्षीत लोंकांनाचं जुजबी ट्रेनिंग देऊन काम चालवून घेतात.यावर सरकारचं काही ही नियंत्रण नसते. अर्थात त्याचे काही पर्यवेक्षण ही नसते. फीस मात्र भरमसाट घेतली जाते. सरळ सरळ लोकांची लूट करून कमी खर्चात सुमार दर्जाची सेवा पुरवून डॉक्टर पैसा छापत असतात. Bottom of Form

 

नामांकित व धर्मादायी रुग्णालयांचा खरा चेहरा

सरकारी सवलतीवर उभ्या राहिलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर अन्याय होतो. राखीव बेड्स उच्चभ्रू लोकांसाठी वापरले जातात आणि सामान्य जनतेला "जागा नाही" असे सांगून बाहेर काढले जाते.मांकित आणि धर्मादायी रुग्णालये गरिबांची फसवणूक करतात. अनेक नामांकित रुग्णालये आणि तथाकथित धर्मादायी रुग्णालये सरकारी जमिनीवर आणि अनुदानावर उभारली जातात. मात्र, त्यांनी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता नसते. सौजन्य ही नसते.अनेकदा ते गरीबांना जागा शिल्लक नाही ही सबब सांगून अक्षरशः हाकलून देतात. उदाहरणार्थ, मुंबईतील एका प्रसिद्ध धर्मादायी रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या बेड्सवर उच्चभ्रू रुग्णांना भरमसाट शुल्क घेऊन दाखल केले होते.सरकारी मदतीवर उभे राहूनही हे रुग्णालये गरिबांची लूट करतात आणि केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांनाच प्राथमिकता देतात.



सरकारी रुग्णालयांतील समस्या

  • फार्मासिस्ट नसणे, औषधांचा अभाव, डॉक्टर अनुपस्थिती, भ्रष्टाचार या समस्या शासकीय सेवेत सामान्य झाल्या आहेत.

  • डॉक्टर खाजगी प्रॅक्टिसवर अधिक लक्ष देतात. त्यामुळे रुग्ण दुर्लक्षित होतो.

  • शासकीय रूग्णालयात डाॅक्टरांची बेफिकीर पावलो पावली पहावयास मिळते. त्याचं एक कारण असते.अनेक शासकीय सेवेतील डाॅक्टर खाजगी दवाखाने थाटून बसतात. अनेक ठिकाणी त्यांची कन्सल्टींग ही सुरू असते.शासकीय वेळेत त्यांना आपलं दुकानं चालवायचं असतं.राजरोसपणे ते असं करू शकतात. सर्रासपणे... शासनाचं कसलचं नियंत्रण नसते.असलं तरी सारं मॅनेज असते. पैसा कमविण्याच्या लालसेतून रुग्णांची लूट करण्याचा नवा बाजार उभा राहिला आहे

  • सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा काळाबाजार, अनुदानाच्या रकमेत अपहार,उपकरणांच्या खरेदीत भ्रष्टाचार अशा घटना सर्रास घडतात. २०१८ मध्ये महाराष्ट्रातील एका सरकारी दवाखान्यात औषध खरेदीसाठी दिलेले कोट्यवधी रुपये गैरवापर केल्याचे समोर आले होते.




डॉक्टरांवरील हल्ले: कारणे आणि परिणाम


  • चुकीचा उपचार, भिती निर्माण करून आर्थिक शोषण, संवादाचा अभाव – या सगळ्या गोष्टी हल्ल्यांना कारणीभूत ठरतात.

  •  डॉक्टर-रुग्ण संबंधातील तणाव अनेक वेळा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्यामुळे किंवा चुकीच्या उपचारांमुळे डॉक्टरांवर हल्ले होतात.उदाहरणार्थ, पुण्यात २०२२ मध्ये एका डॉक्टरावर रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हल्ला केला होता. अर्थिक पिळवणूक व उपचाराची न दाखवलेली तत्परता हे ही या संतापाचे कारण असते.अनेकदा गंभीर रुग्णाच्या बाबतीत नातेवाईकांना अवगत ही करण्यात आलेले नसते. रुग्णाच्या आजाराबाबत गांभीर्य ही लक्षात आणून दिले जात नाही.काहीवेळा गैरसमजातून ही हल्ले होतात. २. राजकीय हस्तक्षेप सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो.अनेकदा मोठ्या रुग्णालयांचे संचालक हे राजकीय नेत्यांचे हितसंबंध पाहतात. उदा.दिल्लीतील एका नामांकित हॉस्पिटलच्या संचालक मंडळात राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचे उघड झाले होते. राजकीय लोक अशा ठिकाणी संचालक असू नयेत पण अनेकदा राजकारण्यांचे नातेवाईक व स्नेही अशी पद बळकावून बसलेले असतात.त्यामुळे अश्या लोकांचा प्रभाव गडद होत जातो.ही रूग्णालय मूळ हेतू पासून दूर जाता

  • राजकीय हस्तक्षेपमुळे काही हॉस्पिटल्स "सेटिंग" वर चालतात. प्रशासन गप्प बसते.


वैद्यकीय शिक्षण आणि मूल्यशिक्षणाची गरज

वैद्यकीय शिक्षण केवळ तांत्रिक ज्ञानावर आधारित असून त्यात नैतिकता आणि मूल्यशिक्षणाचा अभाव आहे. डॉक्टरांनी केवळ व्यवसायिक दृष्टीकोन ठेवण्याऐवजी समाजसेवेच्या भावनेने काम करावे, यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जपान आणि युरोपियन देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणात नैतिक मूल्ये शिकवली जातात, ज्यामुळे तिथले डॉक्टर अधिक पारदर्शक आणि माणुसकीला प्राधान्य देणारे ठरतात. संवेदनशील माणसचं फक्त माणुसकीच्या दृष्टीने काही करू शकतात.प्रत्येक क्षेत्रात व्यवसायीकता वाढली आहे.त्यालाच यशस्वी माणूस मानलेच जात असेल तर प्रकाश आमटे डाॅक्टर व खैरनार यांना यशस्वी कसं समजायचं? भ्रष्टाचारी लोकांना मिळणारा सन्मान: चुकीच्या प्रेरणेचा स्रोत समाजात भ्रष्ट आणि अनैतिक मार्गाने पैसा कमावणाऱ्या लोकांना मोठा सन्मान मिळतो, हे आरोग्य व्यवस्थेतील लूट आणि भ्रष्टाचाराला अधिक चालना देते. डॉक्टर, हॉस्पिटल्सचे संचालक, औषध कंपन्यांचे अधिकारी यांनी प्रचंड पैसा मिळवला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही.अशा वातावरणात प्रामाणिक आणि सेवाभावी डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी हे दुर्मिळ होत चालले आहेत.
  • नैतिक मूल्यांचा अभाव: डॉक्टर केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून तयार होतात.

  • सेवाभावाची उणीव: व्यवसायिकता वाढली आहे, पण समाजासाठी योगदान देणारे डॉक्टर्स दुर्मिळ झाले आहेत.


समाजात भ्रष्ट लोकांना मिळणारा सन्मान

अशा लोकांचे उदात्तीकरण हे तरुण पिढीला चुकीची दिशा दाखवते. सत्य आणि सेवाभावाने काम करणारे व्यक्ती दुर्लक्षित राहतात.


समस्या सुटण्यासाठी उपाय

  1. दर नियंत्रण आयोग स्थापणे

  2. स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा

  3. आरोग्य विमा यंत्रणेतील पारदर्शकता वाढवणे

  4. सरकारी हॉस्पिटल्समध्ये नियमित ऑडिट व सामाजिक अंकेक्षण

  5. वैद्यकीय शिक्षणात मूल्यशिक्षण अनिवार्य करणे

  6. कडक कायदे व कारवाई यांची अंमलबजावणी


निष्कर्ष

माणुसकीचा झरा आटू नये यासाठी सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, आणि आपण सर्वांनी सजग होणे गरजेचे आहे. आरोग्य ही केवळ सेवा नाही, ती एक जबाबदारी आहे. ती व्यापारीकरणाच्या मार्गाने न जाता समाजहितासाठी वापरली गेली पाहिजे.


Meta Title: खाजगी दवाखान्यांची लूट आणि सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी – एक सखोल विश्लेषण
Meta Description: भारतातील खाजगी दवाखान्यांतील लूट, सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि वैद्यकीय शिक्षणातील मूल्यशिक्षणाचा अभाव यावर आधारित सविस्तर SEO ब्लॉग.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खाजगी दवाखान्यांची लूट आणि सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी – एक सखोल विश्लेषण

  सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी 650662278344988579/8340148435986465463 माणुसकीचा आटलेला झरा: खाजगी दवाखान्यांची लूट, सरकारी रुग्णालयांची बेफि...