
Group phota of Poet &Staff
पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

#सामाजिकसमता#आंबेडकरीचळवळ#समतेचा संदेश#BahujanVoices#EqualityThroughPoetry#VoiceOfTheVoiceless
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा जागर करणारे एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी काव्यसंमेलन नुकतंच पाटोदा येथील शासकीय निवासी शाळेत पार पडलं.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" या उपक्रमांतर्गत झालेल्या याकविसंमेलनात नामवंत कवींनी सहभाग घेत रसिकांची मनं जिंकली.'DrAmbedkarJayanti'
कार्यक्रमाची सुरुवात – दीपप्रज्वलन आणि प्रेरणास्थानांना अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित कवींचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नितीन तरकसे यांनी केलं."Ambedkar-Thoughts"
कवींची सामाजिक भानाने परिपूर्ण सादरीकरणं
कवी हरिभगत सर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कविता सादर करत ग्रामीण वास्तवाला भिडणारे शब्द साकारले –
“जमीन शेतकऱ्याची आई, तरीही त्याचा विकास नाही.”
लोक कवी संजय सावंत यांनी "नळावरचं भांडण" या विनोदी कवितेच्या माध्यमातून ग्राम्य जीवनातला व्यंग आपल्या उपहासात्मक व विनोदीशैलीत रसिकांसमोर उभे केले. त्यांच्या या कमालीच्या हास्याच्या लहरी सभागृहात,उसळल्या.
परशुराम सोंडगे यांनी "आई" या भावनिक कवितेतून आईच्या त्यागाची हृदयस्पर्शी मांडणी केली अतिशय भावगर्भ कवितेतून त्यांनी विस्कटत चाललेली कुटुंब व आटत चाललेल्या संवेदनशीलतेवर भाष्य केले.अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
“मी हाडा रक्ताचे केले पाणी
कधीच रे पान्हा चोरला नव्हता.”
कवी,बाळासाहेब नागरगोजे यांनी त्यांच्या "युद्ध पेटले आहे" या कवितासंग्रहातली ' याची कुठे ही नोंद नाही.'ही कविता सादर करत स्त्रीश्रम, दारिद्र्य आणि सामाजिक विसंगतींचा वेध घेतला.
“तिच्या घामाचा एखादा कुंभ का नसेल तिथे?”
युवा पिढीचे आंबेडकरी अभिमानाचे दर्शन
विशाल म्हस्के या युवा कवीने "ऐ राष्ट्रनिर्मात्या" या भीमराव आंबेडकरांना समर्पित कवितेतून त्यांचे विचार प्रभावीपणे मांडले –
“दिधलं संविधान या देशा, जागुन रात्रीच्या रात्री...”
कवी अंकुश नागरगोजे यांनी "सावित्रीच्या लेकी" या कवितेतून स्त्री शिक्षण आणि संघर्षाची बोलकी मांडणी केली.
कवी,अजय भराटे यांनी "फणा" या कवितेतून ऊसतोड मजुरांचे वास्तववादी चित्रण सादर केले, तर सुनिल केकान यांनी "जात" या कवितेतून जातीभेदावरील अत्यंत मार्मिक भाष्य केलं –
“बोलायचं नाही कुणी कुणाच्या जातीबद्दल...”
विद्यार्थी कलाकारांनी रंग भरला कार्यक्रमात
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थिनींचाही सहभाग होता. प्रतीक्षा शिरसट (९वी), अन्वीता भिसे (७वी), व व्हावळे निकिता यांनी आपल्या कविता सादर करत शाळेच्या कलावंतांनीही उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमाच्या यशामागचं नेतृत्व
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रागिनी जोगी मॅडम होत्या. आपल्या भाषणात त्यांनी सर्व कवींच्या सादरीकरणाचं कौतुक करत त्यांच्या शैलीतून मनाला भिडणारा अनुभव श्रोत्यांनी घेतल्याचं नमूद केलं.
सूत्रसंचालन नम्रता बोराडे या विद्यार्थिनीने आत्मविश्वासाने केलं. स्वागतगीत व्हावळे अनुष्का व मस्के ऋतुजा यांनी गात सांस्कृतिक रंग भरले.Rashtra-Nirmata
यशस्वी आयोजनामागे शिक्षकवृंदाचा मोलाचा वाटा
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. तरकसे सर, सौ. रागिनी जोगी मॅडम, तांबे सर, मुंडे सर, मेहेत्रे सर, तांदळे मॅडम, ढोले सर, राऊत मॅडम, डोरले मॅडम, नाईकनवरे मॅडम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
#जयभीम#DrAmbedkarJayanti#RashtraNirmata#ConstitutionMaker#भीमराज#AmbedkarThoughts
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा