भाग 5
तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस त्या उपसून नाही टाकू शकतं.
रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार? खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्तीला काय सांगायचं? सांगायला काहीही सांगू पण तिला ते पडणारं का?
सुरजनं सांगितलं होतं. रेवा अश्या चिखलात फसत गेली.ती आता त्यातनू बाहेर नाही निघणारं. जिथं जाऊन माणूस पडतो तिथचं तो आनंद शोधत राहतो. सुखलालूप असाते माणूस. तिच्या विषयी जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा प्रचंड कणव वाटला होता त्याला. कधी कधी कणव पाझरण्या पलिकड आपण काहीचं करू शकत नाहीत.आज त्याचं रूपात ती भेटली. रेवाला त्याचं काहीचं वाटतं नाही. आपण कोणत्या रूपात भेटतो आहोत याचा थोडा पण संकोच तिला वाटला नाही. अश्या बाया लाज नाकाला गुंडाळून आपल्या अब्रूचं लक्रत वेशीला टांगून टाकतात.
आपल्याला ओळखून ही ती जवळ आली. कसं बिनधास्त बोलली. आपण अश्या एका पुरूषासोबत अहोत. नातं या जगाला सांगू शकत नाहीत. ते नातं आपण ते मिरवू शकत नाहीत. रेवा थोडी पण संकोचली नाही. आपल्या समोर ती त्या पुरूषासोबत होती.काहीचं का नातं नव्हत तिचं नि आपलं? जे शरीर अनेकदा कुशीत घेतलं, कुरवाळलं. ते आज कुणाच्या तरी हातात होतं. काही दिवसापूर्वी फकत जे आपलं होतं. ते आता कुणाचं ही होऊ शकतं. ती असं कसं स्वत:च्या देहाला सार्वजनिक करू शकते? शरीर असं भाडयानं देतात या बाया पण त्यांच मनाचं काय?खरचं तिचं मन कुणात गुंतल असेल? आपण तिच्या सोबत लग्न करायाला हवं होतं का? छे..!! ते कसं शक्यं होतं? तिचं शरीर सोकलं होतं.चटावली होती ती. एका पुरूषासोबत तिला राहणं शक्यं नवहतं. पती व पत्नीचं नात अतुट असतं. सात जन्मं त्यांचा चिरयोग असतो. अश्या बायाना ते कसं शक्यं? काही पुरूषांना तरी ते शक्यं का? आपण आणि रेवा.काही दिवासाचं तरी नातं होतच ना? ते नातं तुटुन जाऊ शकतं पण जे होतं ते मनावरल कसं पुसून टाकायचं? खर तर निलेशला त्या माणसाचा फार राग आला होता. आपल्या पैशाच्या जोरावर तो रेवाला असं उपभोगतोय. ती पैशाला बळी पडतेय. श्रीमंती असं माणसाला विकत नाही घेऊ शकतं. काही मानवी मूल्यं वगैरे काही आहे की नाही? असल्याचं भयंकर वैश्विक चिंता त्याच्या मनात दाटून आल्या.
आपलं नि रेवाचं जसं काही नात. संबध होतं. तसचं तृप्तीच पण असतील काय कुणासोबत? तृप्तीचं सोंदर्यं अनेक पुरूषांना खुणावत. रस्त्यानं चालतानाचं ते लक्षात येतं. अनेक नजरा रेंगाळताततिच्यावर. तिनं ही आपलं सौंदर्य व तारूण्य असचं कुणाच्या हवाली केल नसेल ना? मानानं खरचं ती आपल्यावर प्रेम करत असेल का? मंगळसूत्रं गळयात घातलं की नव-यावर प्रेम जडतचं असेल असं नाही. लग्नं, लग्नं संस्कार ही एक तडजोडचं असेल ना? संशायाचं व्हायरस त्याचा मेंदू पोखरू लागले.
तृप्ती आपली बायको. कुणी तिच्याकडं पाहीलं तरी आपल्याला सहनं होत नाही. तृप्ती फक्त आपली नि आपली असावी असं वाटतं. ती दुस-याची होणं शक्यं नाही. ते आपण सहन ही करू शकत नाहीत. त्या दिवशी तिनं त्या मुलाकडं पाहीलं तर आपण चक्क तिला मारलं.तृप्ती एक स्त्री आहे आपल्या आयुष्यात आलेली. रेवा ही एक स्त्रीच आहे आयुष्यात आलेली. दोघी आपल्या आयुष्यात आल्या. त्यांचे आयुष्यात येण्याचे मार्ग भले वेगळे असतील पण त्या आपल्याचं आहेत ना? तृप्ती आपलीचं आहे. गळयात मंगळसूत्रं आपलं.मगळसूत्रं हे मालकी हक्काचां शिक्का असेल का? आपल्या संस्कृतीमध्ये त्याला फार छान आहे. सौभाग्याचं लेणं. आपलं सौभाग्याचं लेणं गर्वांन फिरवत अनेक स्त्रीया वावरतात. अनेक मगंळ सूत्र घालून ही. आपल्या पुरूषाशी प्रमाणिक नाही राहत. उगीचं त्याला अनेक बायांची नावं आठवू लागली.
रेवा आज मात्रं कुणाची ही होऊ शकते. रेवा कुणाची बायको झाली असती तर बरं झालं असतं. चक्क.. कॉलगर्लं… रांङ.निलेश असं सारं आठवत असताना तृप्ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहीली हे पण त्याच्या लक्षात नाही आलं.
“निलेश, बरं नाही का तुला?” तृप्तीनं काळजीच्या स्वरात विचारलं. तृप्तीच्या मनात प्रश्न दुसरेच होते पण तिनं ते नाही विचारले. तिला ते विचारयचं ही नव्हतं. मनात जे वाटतं ते सारचं आपण विचारू नाही शकत. काही तरी बोलावं म्हणून ती बोलली.
“तसं काही नाही. आय ॲम ओके.” तो दचकला. सावध झाला. त्याच्या मनात काय चाललं हे थोडचं तृप्तीला कळणारं होतं.
“मग का उभा आहेस असा? आवर ना फ्रेश हो.”तृप्तीनं त्याचा हात हातात घेतं म्हटलं. निलेशनं तिच्याकडं पाहीलं.मोकळे सोडलेले केस.चॉकल्टी कलरचा गाऊन.. अंधारात ही ठळक लक्षात यावा इतका गोरा रंग.अंधारात गोरा रंग..नि चॉकलेटी कलर कसलं जबरदस्त कॉब्मीनेशन असतं. कुणा ही पुरूषाचं भानं हरपून जावं इतकी सेक्सी दिसतं होती तृप्ती. निलेशचं मन कुठं ठीक होतं. अचानक झालेल्या स्पर्शानं तो भानावर आला.तिच्या डोळयात पाहीलं. ती कुशीत शिरली.तिचा तो मलमली उबदार स्पर्श ही त्याचं भानं हरपवू शकला नाही.
“तृप्ती, प्लीज. अस एकटचं राहू दे काही वेळ मला.” तृप्तीच्या डोळयात खोल पहात तो बोलला. रेवा नं तृप्ती या दोघीची तुलना त्याचं मन करू लागलं.रेवा असं कधी शांत कुशीत नाही शिरली.ती आदळायची येऊन चक्क अंगावर. तिला हवं ती ओरबडून घ्यायाची. तृप्तीचं तसं नाही. ती कसं अलगद उलगडत जाते. फुलांच्या पाकळया अपोआप उमलाव्यात तसं. त्यानं तृप्तीला हातानं अलगद थोडसं थोपवलं.
“पण का? आपली एकत्रं यायची वेळ झालीय आता?”
“चूप.तू शांत बसं.” त्यानं तिला झिडकारलं.
“असं का करतोस? एवढा का डिस्टर्बंस तू?”
“ऐ, चूप. काही डिस्टब्र वगैरे नाही.प्लीज थोड एकटं राहयचं मला.”
“निलेश, रात्र झालीये. मी नाही सोडणारं तुला एकटं.”
“का?
“का म्हणजे.. तू नवरा आहेस माझा.असं कसं सोडीनं?”ती त्याच्या अधिक जवळ जात बोलली.मनानं भरकटलेल्या आपल्या नव-याला आपलसं करण्यासाठी अजून दुसरं ती काय करू शकत होती?
“तृप्ती, खरचं आज मूड खराब माझा.”
“मूड खराब..? तू बोलतोस हे? अशी मी समोर आलेली. रात्र ही अबोल थोडी. चांदणं.. हया चांदणया…तुलाचं काहीच वाटत नाही.तुझा मूड चांगला करण्यासाठी मला अजून काय करावं लागेल?”
“तू शांत झोपलीस तरी पुरेसं आहे.” निलेशनं वैतागून म्हणला.
“मला तुझ्या कुशीत झोपायचं. एकटं झोपायची सवय मोडली माझी आता.”
”प्लीज,तृप्ती.“
“असं कोण ती तुझी? तुझा मूड खराब केलाय?”
“तशी कुणीचं नाही. फक्तं जीव तुटतो तिच्यासाठी.”
“निलेश, कॉलगर्लं ना ती?तिच्यासाठी जीव तुटतोय तुझा?”
“अग, तसा नाही जीव तुटतं?”
“मग कसा?
“कॉलगर्ल माणसं नसतात. परीस्थिती फेकते माणसांना त्या किचडंमध्ये. रेवा एक हुशार नि कर्तबगार मुलगी होती. आज कोण त्या रूपात मला तिला पहावं वाटलं. अशी भेटायाला नको होती ती. वाईट मला ती भेटल्याचं नाही वाटतं ती तुझ्यासमार येऊन बिनधास्तं भेटलीयाचं दु:ख झालंय.तिला काहीचं वाटलं नाही. ती खुशाल येउन भेटली मला. थोडा पण संकोच नाही वाटला तिला.”
“असं काय विचार करतोस? धंदा करतेय ती. धंदयात सारेच पुरूष तिचं कस्टमरचं आहेत की. सा-याकडचं ती एक कसटमर महणून पाहणारं ना?तुझ्या वर्गात असली म्हणून काय झालं?”
“तृप्ती असं काही कसं काय बोलतेस?”
“ती अशी एकटीचं कॉल गर्ल नाहीये. अश्या हजारो बायका आहेत.सभ्येतचा बुरखा पांघरूण.अंधारात नागडया होणा-या.त्यातं काय एवढं?निलेश धंदा तो. प्रत्येक धंदयाच्या काही गरजा असतात. रांडाना लाजून नसतं जमत. ज्या जास्तं लाजा सोडतात त्यांना.. जास्तं भांव असतो व जास्तं मागणी पण असते.”
“तृप्ती…???” तो रागवला होता. चिडला होता. अजून जर तृप् काही बोली आसती तर त्यानं तिला मारलं ही असतं.
“पण तू इतका का इमोशनल झालास? ह्रदय तर गुंतलं नाही तिच्यात?” तृप्ती खटयाळ हासली.
“तृप्ती..?” असं म्हणला.पुढ झेपावला. तृप्तीला मिठीत घेतलं. त्यानं सा-याचं गोष्टीला टर्नं दिला.
“आता माझं.. ह्रदय फकत.. इथं गुतंल.”तिला आपल्या छातीशी कवटाळतं निलेश बोलला.तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी मनात असंख्यं प्रश्न उभे होते. निलेशच्या मिठीत शरीर होत. मन थोडचं कुणाला मिठीत घेता येतं? रेवाचं नि निलेशचे नेमके संबध नेमके कसे असतील? रेवा हे नाव खरं असेल की धारण केंलेले नाव असेल? आसल्या बायांची खोटी नावं असतात. पिंकी.गुडडी.इला,सोनी, मोनी.नावातून त्यांची वय कमी असावेत असा भास व्हावा. आपलं वय नि ओळख लपवण्यासाठी असं नाव धारण करतात आसल्या बाया. रेवाचं ही तसचं तर नसेल ना? तृप्तीच्या प्रश्नाला काहीचं अर्थ नव्हता. त्यातला एक ही प्रश्न ती विचारू शकली नाही. पुन्हा ते काहीचं बोलले नाहीत. त्यांचे श्वासचं बरं काही बोलत राहीले आपसांत.
आज तृप्ती प्रसन्न होती. निलेश आज एका कॉन्फरन्ससाठी जात होता. त्याला लवकर निघावं लागणारं होतं. त्यानं आवरायाला हवं होतं पण तो अजून ही लॅपटॉपवरचं होता.लवकर जायचं म्हणजे लवकर आवरायाला हवं. उठून नुसता लॅपटॉपवर बसला होता. लेटं झालं की तो नुसता चीड चीड करतो. तृप्ती त्याला हासून उठू लागली. तर त्याचा मूड रोंमाटीक झाला. सकाळीचं आठ ही वेळ काही रोंमाटीक होण्याची वेळ नाही. सकाळी सकाळी बायांची कसली धांदल उडते. नव-यानं त्याचं फारसं काही देणं घंणं नसतं. निलेशनं लगेच तिला जवळ ओढलं.तिनं खरचं त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. ते बंध रेशमाचे..!! सुटता सुटेनात.
बाबांच्या औषधांचा वेळ होती. आईच्या पूजेची. त्यां दोंघानी सारं हातात हवं असतं. सारी कामं तृप्तीची वाट पहात पडली होती. निलेशचा रोंमांटिक मूड होता.त्याच्या तावडीतन सुटण्यासाठी ती प्रयत्न करत असतानाचं तिचा फोन वाजला.निलेशच्या मिठीतून सुटायला तिला हे कारण पुरेसं होतं.ती धावतचं किचन मध्ये आली. फोन रिस्व्हं केला. श्रेयचा फोन होता.श्रेयानं इतक्या सकाळी फोन का करावा? ती असेल फ्री पण तृप्तीला कुठं उसंत होती. नोकरी करणा-या बायाचं तेवढं बर असतं. घर कामाला बाया लावता येता. घरच्याच फार तगादा नसतो. त्या कमवत्या असतात.श्रेया असेल निंवात… ऑफीसला दांडी सुध्दा असू शकते तिची.
“हॅलो,गूड मॉर्निंग.. तृप्ती.”
“मॉर्निंग टू यू. थँक्सं. आज एवढया सकाळी फोन?”
“तू,फ्रीस ना पण?”
“मी कसली फ्री? ते शक्यं तरी का या जन्मी.”
“एवढं काय चिडतेस?”
“मी का चिडू? तुझ्यावर नाहीच नाही. निलेशला कॉन्फश्रन्साला जायचं. तो अजून ही उठतं नाही.”
“ त्याला जायचं ना? तू का एवढं टेन्शनं घेतेस? त्याचं त्याला कळू नाही का?”
“ तुला माहीत नाही. लेट झालं की नुसता चिड चिड करतो.”
“ तुमचं चलू दया. तो नवरा. तू बायको. आम्हला तुला फक्त थँक्यू म्हणायच ग.”
“ अग टाक ना म्हणून मग? त्यासाठी का आता मुहूर्त पाहणारेस का? असं काय केलं मी. तू थँक्यू म्हणावस असं?”
“अग,मी नाही म्हणणार? आदीला मानायचेत तुझे आभार.”
“आदी..!! कसा तो आता?” अश्चर्यानतिचा चेहरा फुलून आला.
“घरी आलाय तो रात्री आमच्या. खर तरं त्याची रात्रीचं इच्छा होती तुझे आभार मानायची.”
“मग?
“मग काय? टाळलं मी. रात्रीचं दहा वाजता ही काय वेळ का बायकांना फोन करायची? रात्री बायका फक्त नव-याच्या असतात.”
“ गप चावट कुठली.”
“मी पण एका नव-याची बायको. यात का नवीन आपल्याला? आदिला काय काय कळणार? मासूम ना तो अजून. त्याचं लगन नाही झालं अजून.”
“लग्न न झालेली पुरूष् मासूम असतात?” तृप्ती फोनवर बोलत होती. तेवढयात निलेश मागून आला. त्यांन चक्क मिठीत घेतलं नि म्हणला, “लग्न न झालेली पुरूषं मासूम असतात नि लग्न झालेली खडूस. असचं ना?” तृप्नं त्याला खूणानेच चूप राहण्याचा इशारा केला. निलेश गप राहणं एवढं सोप नव्हत. त्यानं एक गुलाबी ओरखडातिच्या उघडया पाठीवर ओढला. तशी ती शहारून आली. नकळतच शब्दतिच्य तोंडातून बाहेर पडला. ‘आई ग?’
“ का ग? काय झालं?”
“ काय नाही?मांजर आलं किचनमध्ये.”
“ मांजर की बोका?
“बोका.. लांब लांब मिश्यावाला.. “ तृप्ती त्याच्या मिश्यावरून हात फिरवत म्हणाली. आता हे तर निलेशला चँलेजच होतं. त्याला थोपवणं तृप्तीला कुठं शकयं होतं?
“श्रेया, मी तुल पुन्हा कॉ करू का?”
“अग, आदिला तर बोल ना?”
“ऐक ना? निलेशला उशीर होतोय. मी कॉल करते ना नंतर. बाय.बाय..” तृप्तीनं फोन कट केला. फोन चांगला कट झालाय याची खात्री केली. कट करावचं लागला. फोन वर जर आदि बोलू लागला आसता तर? निलेशला लगेच कळलं असत. तृप्तीच्या पोटात प्रचंड भितीचा गोळा उठला होता.तिनं त्यातून ही स्वत:ला सावरलं.
“निलेश तुला काही कळेल का नाही? श्रेयाला सारं कळलं असेलं.”
“त्यात काय एवढं? मी कुठं काय केल?नवराय मी तुझा.”
“नवरा. म्हणून काय….?” पुढील शब्द तृप्ती उच्चारू नाही शकली. कसं उच्चारता येतील? लीप लॉक केलं होते निलेशन. श्वासांचा आवाज व गती ही वाढली होती काही क्षंण.तिनं निलेशला पटापटा आवरून दिलं.त्याला बाय करूनचं ती घरात आली.
बाबा पेपर वाचत बसले होते. आई ..देवळात गेल्या होत्या. निलेश एकदाचा गेला.तिला रिलॅक्स वाटलं.बरं झालं आपण फोन कट केला. आदि कडे फोन दिला आसता तर? निलेशनं तयाचा आवाज ऐकला आसता तर? त्या कल्पानानी सुध्दा घाम फुटला होता.तिनं तो पदरानं पुसला.श्रेयाला पण काही कळत की नाही. असा कशाला फोन करायचा? एक चांगल झालं आदि. सुधारलाय.श्रेयानं पुन्हा कॉल केला नाही हे ही बरं झालं. आदिच्य प्रकृतीत सुधारणा झाली.तो थँक्स म्हणू शकणारं ही बातमीतिच्या मनाला सुखावून गेली. तिच्या डोळयासमोरून आदि हालत नव्हता. कारूण्याचं अमृत कण तिच्या मनात जमा होऊ लागले होते. आता शांत बसण शक्यं नव्हतं.तिनं फोन हातात घेतला.
आदिचा मेसेज होता.
( पुढील भाग लवकरचं.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा