मराठी साहित्य संमेलन हे साहित्य, विचार आणि नव्या दृष्टिकोनांचा मिलाफ असतो. दरवर्षी यात वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन होते. यंदाच्या संमेलनात ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर चर्चा सुरू असताना, नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे संमेलनाचा रोखच बदलला. ही चर्चा ‘आम्ही कसे बिघडलो’ याकडे वळली आणि साहित्यसंमेलनाला अनपेक्षितपणे राजकीय वळण लागले.
साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश आणि त्याला मिळालेलं वळण
साहित्य संमेलन हे नेहमीच विचारवंत, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचा मंच राहिला आहे. साहित्य, समाज आणि संस्कृती यावर प्रगल्भ चर्चा व्हावी, नव्या संकल्पना समोर याव्यात आणि विचारांना चालना मिळावी, हाच संमेलनाचा मूळ हेतू असतो. मात्र, यंदा झालेल्या चर्चेने या संमेलनाचे स्वरूप बदलल्याचे जाणवले.
नीलम गोऱ्हे यांनी ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर बोलताना शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर टीका केली. परिणामी, एका साहित्यिक चर्चेचे राजकीय कुरघोडीत रूपांतर झाले.
नीलम गोऱ्हे यांची भूमिका आणि उद्धव ठाकरेंवरील आरोप
नीलम गोऱ्हे या अनेक वर्षे शिवसेनेशी जोडलेल्या होत्या. त्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापतीही राहिल्या आहेत. मात्र, पक्षातील गोंधळ आणि मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी मांडलेली भूमिका पाहता, चर्चा साहित्याच्या प्रगतीपेक्षा राजकीय नेतृत्वाच्या अपयशावर जास्त केंद्रित झाली.संमेलनाचा मूळ हेतू विचारात घेतला तर ही बाब खटकणारी होती.मराठी साहित्य संमेलन हे केवळ राजकीय व्यासपीठ नाही, ते साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चर्चांसाठी प्रसिद्ध आहे. तसचं तिथे घडलं पाहिजे.आपल्या राजकीय हितासाठी मराठी साहित्य संमेलनासाठी व्यासपीठ वापरणं एकदम चुकीचे आहे ती नियम गो-हे यांनी केली. एकंदरीतच राजकारणातील लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे.मात्र,जकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे साहित्य संमेलन राजकीय प्रचाराचे साधन होऊ लागले आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होतो. साहित्यरसिकांना चीड पण येत आहे.साहित्य संमेलनाची राजकीय मालकी वाढते आहे का?
गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनामध्ये राजकीय वाद वाढताना दिसत आहेत.काही वर्षांपूर्वी संमेलनाच्या अध्यक्षपदावरूनही मोठे वाद झाले होते.साहित्य संमेलनात वेगवेगळ्या राजकीय गटांचे प्रभाव वाढत चालले आहेत.विचारमंथन आणि साहित्यिक चर्चा बाजूला पडून राजकीय विचारांचे समर्थन किंवा टीका करण्यावर अधिक भर दिला जात आहे.साहित्य संमेलनाचा पुढील वाटचाल कोणत्या दिशेने जाईल? राजकरणाचा आखाडां जर संमेलन बनवू लागले तर काय करायचं? संमेलनाने साहित्याच्या मुळ उद्देशावर लक्ष केंद्रित करायला हवे. राजकीय चर्चांमुळे संमेलनाची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. मराठी साहित्य आणि त्याच्या भविष्यासाठी संमेलनाला पुन्हा साहित्यिक चौकट परत मिळणे आवश्यक आहे. राजकीय हस्तक्षेपांपासून मुक्त होऊन, विचारस्वातंत्र्य आणि साहित्याच्या समृद्धीवर भर द्यायला हवा.संमेलन ‘विचारमंथनाचे व्यासपीठ’ राहील की ‘राजकीय प्रचाराचे साधन बनेल हा येणारा काळचं या प्रश्नाचं उत्तर देईल.‘आम्ही कसे घडलो’ या चर्चेने खरेतर ‘आम्ही कसे बिघडलो’ हेच दाखवून दिले.
साहित्य संमेलन राजकीय कुरघोडींसाठी वापरले जाऊ नये, हे लक्षात घेतले पाहिजे. भविष्यात साहित्य संमेलन हे साहित्याच्या विचारमंथनासाठीच राहावे, अन्यथा ते राजकीय आखाडा बनण्याचा धोका आहे.
– शब्दगंधा टीम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा