फुटलेला पेपर आणि राजू
जालना जिल्ह्यातील एका शाळेत, दहावीचा गणिताचा पेपर फुटला.बातमी वा-यासारखी पसरली आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक आली. कोण कुठून पेपर मिळवतोय, याचा शोध सुरू झाला पण राजू मात्र या सगळ्यापासून अलिप्त होता.राजू अभ्यासू मुलगा होता.त्याला लायकीच्या बळावर पास व्हायचं होतं पण त्याच्या समोर मराठीचा फुटलेला पेपर उभा होता.रडका,थोडासा चिंतेत आणि काहीसावैतागलेला.त्याचा अवतार फारच कळा गेलेला होता.रडून रडून डोळे सुजले होते. हा आपल्याकडे का आला आहे हे राजूला कुठं नव्हतं.
"राजू, माझं ऐकशील का रे?" पेपर डोळे पुसतं बोलला.
"अरे, तू बोलतोस?म्हणजे तू बोलू शकतोस? आणि इतका दुःखी का आहेस?फुटलास तूच आणि रडतोस पण तुच.कमाल बुवा तुझी..!!" राजू त्याच्याकडे राग राग पहात बोलला.त्याला बातमी आल्यापासूनच फुटलेल्या पेपरचा राग आला होता.
"मी काय स्वतःहून फुटलो का रे? मलाही कुणीतरी फोडलंच असेल ना?कुणी तरी फोडल्या शिवाय काहीच फुटतं नाही रे. साधं लाॅजिक हे.आता माझ्यावर सगळे ओरडतायत.खासदार,आमदार फुटतात, पक्ष ही फुटतात, लोकही फुटतात... मग मीच का दोषी? फक्त मीच फुटलो का या जगात? सारेचं गद्दार असतात रे." पेपर काकुळतीला येऊन बोलत होता.
"खरंच रे, पण तुझ्यामुळे किती जण नक्कल करून पास होतील,आणि किती जण मेहनत करूनही नापास होतील, याचा विचार केलास का?परीक्षाला काही अर्थच राहत नाही ना? गद्दारी करणं चांगली नाही रे." राजूला आता पाठ केलेले सुविचार सांगण्याची तलप आली होती. तो बडबडू लागला.
"का रे तुम्हाला गद्दार सरकारं चालतात.आमदार, खासदार फोडलेला चालतात मग माझाच का एवढा बोभाटा?" पेपर जरा चिडला होता.
" ते राजकारण असतं.ते तसचं खेळणार रे.तू अनेकांच्या भविष्याशी खेळतोस रे." समजावणीच्या सुरात राजू बोलला. राजाचं खरं होतं. आता परिक्षेत असं राजकारण करणं कितपत योग्य?
"अरे बाबा, मी कुणाला सांगतोय का कॉपी करायला? मलाच फोडतात सारे.तुमचे शिक्षक, पालक,अधिकारी सगळे हात धुवून माझ्या मागे औ. माझ्यावर माया दाखवणारा कुणीच नाही. मला,तरी कुणी तरी माणसं फोडतात ना? मी काय एकटाच फुटतो का? हल्ली कुठल्या ही परीक्षेचे पेपर सहज फुटतात.पण एवढा बोभाटा नाही होत."
"आता फुटल्यावर बोभाटाचं होणार ना?"
"अशी परिक्षा आहे का या महाराष्ट्रात तिचा पेपर फुटतात नाही. जी मेन असेल नाहीतर नीट असेल यांचे पण पेपर फुटतातचं की.खरचं,तूच सांग बरं पेपर नाही फुटला तर पोरं पास कशी होणार?"
राजू गप्प बसला.त्याला पेपरचं दुःख कळत होतं. पण त्याहीपेक्षा,आपल्या समाजाचं वास्तव त्याच्या लक्षात आलं होतं.पेपर बिचारा आपण होऊन कसा फुटेल?माणसंच फोडतात त्याला. हेच सत्यं आहे हे राजूला करून चुकलं होतं.
"पोरं पास तर झाली पाहिजेत ना?नाही अभ्यास करीत पोरं.तुम्हाला सां-यानांच पुळका येतो पोरांचा.मग फोडतात तुम्ही.मी काय करणार? हतबल करतात,मला सारे." पेपर त्याची करूण कहानी सांगत सुटला.
"माणसं अशीच का वागला लागलीत हल्ली हेच मला कळेना?"
" माणसाचं नको विचारू.फुटल्यावर काही आम्ही एन्जॉय नाही करतं ही गद्दारी."
"ते आमदार तर बियर पिऊन भन्नाट नाचले होते."
" त्या नाचणा-या आमदार वर नको जाऊ. नाचत असले तरी बुडाला त्यांच्या आग लागली असते.सारी नाटकं असत्यात त्यांची."
"असं लगेच का फोडतात तुला.पहिल्याच दिवशी असं का फुटलास रे."
"पोरं हुशार करायची पण असतात.परिक्षा पण कडक हव्या असतात. नापासांची चिंता असते सरकारला.मग फुटावंच लागतं आम्हाला.सरकारचं टेन्शन असत,यार.!!!आम्हाला जरी काळीज नसलं तरी वाटत काही तरी करावं या बिच्चा-या पोरांसाठी.सरकार साठी अधिकारी ही झक मारतात आणि आळ आमच्यावर घेतात."पेपरचा चेहरा लालबुंद झाला होता.
"समाज असा वागतोय की,कुणालातरी फोडायचं आणि त्यावर राजकारण करायचं.मग ते परीक्षा असो राजकारण असो, की घरगुती भांडणं..!! जाऊ दे.तू मला का सांगतोस हे माझीशकाहीचं तक्रार नाही यार." राजू सारवासारवी करत बोलला.
" राजू, तू तरी अभ्यास कर.फोडाफोडीचा रोगच झालाय माणसाला." तो तरा तरा निघून गेला.
इतक्यात राजू घाबरून जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम होता.त्याने उशाशी ठेवलेला अभ्यासाचा पुस्तक उचललं आणि पुटपुटला बिच्चारा पेपर...!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा