छावा, चित्रपट तुम्ही पाहिलायं का?
याचं उत्तर तुमचं 'नाही' असं असेल तर
हे काय हे जिणं तुमचं..!!
पहा, ना मग उशीर कसला करताय? तुम्हाला तो पाहायचा तर आहेच ना? मग बघा ना लवकर...!! उशीर का करता..?
हे पहा तो थिएटरला जाऊन पाहयचा आहे.कुठं ही आणि कसा ही पाहयचा नाही.
मज्जा नाही येणार?
साॅरी..!! छावा चित्रपटाची मज्जा नाही घेऊ शकत कुणीचं.आपलं काळिज कुणी होरपळून काढताना कुणी सिनेमा एन्जॉय करू शकत का? ते शक्य नाही.
धडपडणारे जर ह्रदय तुम्हाला असेल तर तुम्ही न रडता तो चित्रपट पाहू नाही शकत.
काय म्हणता?
इतकं इमोशनल का होताय.साधा चित्रपट तो? फार तर तो छान जुळून आला आहे असं म्हणा.कलाकाराचं कौतुक करा फार तर.
चित्रपट तो.एक कलाकृती म्हणूनच पहा ना? कुणाचं पात्र कसं रंगलय? हे सांगत बसा.आहो,रडताय काय तुम्ही? ही एक कलाकृतीची आहे याचं भान ठेवा.ते सारं सारं खोटं असतं.सारं रंगवलेलं असतं. चित्रपट गृहातचं
शिवगर्जना वगैरे .... हे फार अति होत हं...!!
खरं तुमचं.ते सारं रंगवलेलं आहे. मला माहिती ही आहे ते सारं खोटं घडतयं.इफेक्ट दिलेले सीनस् आहेत ते सारे.
सारं सारंचं खोटं पण आम्हाला खरं का वाटतयं सारं.आता आताचं घडतयं असं का वाटतयं सारं..?
विकी कौशल्य,ती रश्मिका ते सारे कलाकार आहेत हे का विसरलोत आम्ही. ते सारे खरचं वाटू लागलंय.
इतकं इमोशनल टच का होतोय?आमच्या मनाच्या पटलावर हे सारं चलचित्र पिढयानं पिढया कोरले गेलेले आहे त्यामुळे ही असेल कदाचित.
मराठ्यांचा इतिहासाचं रक्ताने लिहीला गेलेला आहे.कंकू पुसलं जाताना अनेकीच्या आश्रूंच्या ज्वाला झाल्यात...ठिणग्या उठल्यात.प्रत्येकीच्या पुसलेल्या कुंकूवाच्या,त्यागातून हे स्वराज्य आणि स्वाभिमानाचा यज्ञ पिढ्यान पिढया धुमसत राहिला आहे.
अजून ही धुमसतचं राहणार आहे. स्वराज्यासाठी प्राण तळहाती घेताना इथला प्रत्येक माणूसन् माणूस पेटला होता.
आमचा इतिहास ज्वलंत आहे.तो आम्हाला असाचं आमच्या छातीत पेटता ठेवायचा आहे. कुणीतरी राखेत धगधगत्या निखा-यावर फुंकर मारली.तो पुन्हा...रसरसून आला असेल का? असचं काही तरी घडते आहे हा चित्रपट पाहताना.एवढं नक्की...!!!
प्लीज...!!! कुणी त्या इतिहासाचा काथ्याकूट पुन्हा नका करत बसू. त्या पुराव्याच्या संदर्भाच्या झंझळात नका इतिहास आम्हाला सांगत बसू.
शट अप..!!!
आम्हाला असाचं हा धगधगता निखारा प्रत्येक काळजात धुमसतं ठेवायचा आहे. असाचं इतिहास आम्हाला हवा आहे.
शपथ..!! या चित्रपटात इतिहासाचं जिवंत केला गेलाय आमचा.
त्या निर्मात्याचा लयचं खिसा भरतोय.बाॅक्स ऑफिसवर तुफान राडा केलाय छावाने...!!
भरू दया की. पोटात दुखू देऊ नका.
सैराट सारखा एका लफड्याचा चित्रपट आपण डोक्यावर घेतला होता. हा तर आपला इतिहास आहे.
मृत्यू ही जिथे शरण येतो.त्या वीराची ही गोष्टं.
नसानसात स्फुलिंग चेतवणारा इतिहास आहे हा..!!!.ही नशा,ही धूंदीच आम्हाला हवी आहे.
थँक्यू. !!! छावा टीम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा