पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!!
'पुष्पा-02 तुम्ही पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर आहे तो ..!! नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग
'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?'
ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02 न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे.
अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं.
तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट ओढता ,जेवण करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो?
छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात.
पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..??
तुम्ही मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला.
पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्दीत तुम्ही नाही? कसं वाटतयं तुम्हाला?
रेकॉर्ड होत असताना आपला पण खारीचा वाटा पाहिजेना त्यातं..!!
बघा,ना एकदाचा पुष्पा-02
काय त्यात एवढं? असं काय विचारता?
'झूकेगा नही साला' असं म्हणतं एक गावठी आडाणी उडाणटप्पू पुष्पराज आहे त्यातं.फारच बेधडक वागतोय तो.कधी कधी तो सटकतो पण.
तुमच्या आमच्या मनात असा एक हिरो दडलेला असतो.आपण त्याला दाबून ठेवलेले असते आपल्या आत. तोच उफाळून येतोवर. तुटून पडतो तो समोरच्यावर... या व्यवस्थेवर
.!!
भौतिकशास्त्राचं सारे नियम झक मारतात त्याच्या पुढे..!! पिक्चरमध्ये रोमान्स भी सपक नाही दाळभातासारखा.पुळचाट..!! पुष्पराज हे असलं डेंजर माणूस आणि ती तसली त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी त्याची ती फटाकडी श्रीवल्ली...!! काय अफलातून पोट्टी यार...!! बालीवूडमधल्या सा-या नटया मिळमिळ वाटतात सा-या रश्मिका पुढे. ठेचा ती... !! नुसता झणझणीत..!!
झुकेगा नही साला म्हणतं भिडणारा प्रचंड महत्वाकांक्षी माणूस पुष्पराज बघा एकदाचा. तेवढचं रक्त थोडं फार गरम होतं काही वेळा पुरतं.
कुणा पुढं ही शेपट्या घालून गोंडा घोळत बसणारी माणसाची कुत्रे झालेली तर आपण रोजचं पहात आहोत.
काय म्हणता? त्या पुष्पराजची व श्रीवल्लीची जात कोणती आहे? इंटर कास्टं लफडं तर नाही ना ते..आपल्या सैराटमधील अर्ची आणि परश्या सारखं..?
डोंबल आमचं....!! घ्या आता. ते कुठं माहित मला?
हॅशटॅग्स तयार:
#Pushpa2Rocks
#झुकेगानहींसाला
#PushpaRajOnFire
#SrivalliForever
#RecordBreakingPushpa
#ActionKaBaap
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा