||आपलाच संवाद आपल्याशी
दिवस रोज उगवतो. उगवलेला सूर्य रोज मावळतो.अंधाराचं जाळं फेडत फेडत सूर्य येतो. त्याची चाहूल पुर्वी आपल्या ओठांवर लाली पसरतं देते.पहाटं रंग उमटले की चैतन्य सृष्टीच्या कणाकणांत पसरतं जातं.प्रसन्नताच सकाळ घेऊन येते.अंगास झोंबणारा गारवा असेल.झुळझुळणारा वारा असेल.किलबिलणारे पक्षी असतील.सकाळी सारं कसं मस्त असतं.ताजं ताजं असतं. भेटणारी हवा असेल नाहीतर माणसं...
सकाळ रोज येते म्हणून उदास वाटत नाही.ती रोजच्या सारखीच येते.नटतं नाही.थटतं नाही. प्रसन्नता व ताजेपणा तिचं वैशिष्ट्यचं असतं.
सकाळ अल्लड पोरी सारखी निरागस असते.लोभस असते. हवीहवीशी असते.
ती रोज असते पण आपल्या सर्वांना ती रोज भेटतेच असं नाही.तिच्यासाठी आपल्याला काही वेळ आपल्या खुराडयातून बाहेर पडावं लागतं? सकाळ कुणाच्या बेडरुम मध्ये नाही येत.त्यासाठी थोडं मुक्त व्हावं लागतं.मुक्त वगैरे म्हणजे असं फार काही नाही. मार्नींग वाकला जावं लागतं.बस्सं..
ती आपल्या स्वागताला सज्जचं असते.
सकाळी सकाळी फिरायला जायचा स़ंकल्प तर या वर्षी तुम्ही पण केलाचं असेल?मी पण केलाय. बहुतेक जण करतात.अरोग्यासाठी चा़घल असतं. काही अजून पाळत असतील.काहीचा तुटला ही असेल. संकल्प फार नाजूक असतात. ते लवकर तुटतात.ज्यांचा चालू असेल त्यांचा ही लवकरचं तुटेल.नेहमी असचं होतं.त्याचं कारणं आळस. आळस हा पक्का मानवीय स़ंकल्पद्रोही आहे. लाखो लोकांच्या संकल्पाचं तो भरीत करतो.
आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत.ऐकत आलो आहोत पण आपण त्याला शत्रू थोडचं मानतो? तो आपला तसा ब-याच जणा़चा जीवलगच असतो. तो आपल्या प्रेमापशात माणसाला पुरता जखडून ठेवतो. त्याची ही मिठ्ठी सोडवत नाही माणसाला.त्याला झटकून टाकला तर रम्य सकाळ आपल्याला भेटते.सकाळच्या हवेत सकारात्मक उर्जा पण असते. ती आपल्या अंगातून शरीरात प्रवेश करते.मनाचा ताबा घेते. अनुभवातून हे बोल आहेत.आज तीन दिवस झालयं.मार्निंग वाकला जातोय.तुम्ही जाता का? बघा जमलं तर अवघड पण अशक्य नाही.
सुप्रभात...!!!
परशुराम सोंडगे
||Youtuber||Blogger||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा