अण्णांनी समुद्र पाहिला नाही. असचं ते एकदा बोलता बोलता म्हणाले परशु,
मी अजून समुद्र पाहिला नाही.
"कसं काय?"
"आमचा कशाला योग आलाय? रावणाच्या लंकेत जाण्यासाठी वानर सेनेने शीळा पाण्यवर तरंग ठेऊन सेतू बांधला होता.समुद्र दरी खोल असते जणू."
"७१ टक्के या पृथ्वीचा भाग समुद्रानं व्यापलेला आहे." मी त्यांना माहिती दिली.काय बोललो आहे. हे त्यांना कळणं शक्य नव्हतं.आण्णा निरक्षर होते.
"म्हजीं"
" बारा आणे पाणी आहे.चाराणे जमीन..."
"एवढं मोठं पाणी?" पृथ्वीचं आकार त्यांना काय माहित? पृथ्वी शेषांच्या फण्यावर आहे हे त्यांना माहित होतं.पोथी पुराणातून ते ऐकतं होते.पोथी पुराणात खोटं असू शकत नाही असा त्यांचा दृढ विश्वास.एक ही दिवस शाळेत न जाणाऱ्या अण्णांचा हा शब्द साठा रामायण,शिशिवलिलमृ व महाभारत अश्या ग्रंथातून आलेला होता
"समुद्र पाहिला नाही बघ मी.तुम्ही आत्ताची पोरं किती पाहिला असेल.अशी फोटो पण काढलेत. "त्यांना ते अप्रुप वाटलं होतं.
"आपण या वर्षी उन्हाळ्यात जाऊ.मला सुट्टी लागली की."
हे आश्वासन देऊन मी मोकळा झालो.ते फक्त हासले. ते हासणं गुढ होतं.त्याचा अंदाज मला काढता आला नाही.
"हासतात काय खरचं जाऊ.. पाण्यात पोहू.. वाळूत लोळू." ते गप राहिले. जग पाहण्याची सर्वांनाच आवडते. त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात मी स्वप्न पेरले होते.मला सुट्टी लागायच्या आणि मध्येचं आण्णा आजारी पडले.
भूगोल शिकलो होतो म्हणून मला समुद्र माहित होता. मी पण बरेच दिवसं म्हणजे चांगला मोठा होऊस्तोवर मी समुद्र पाहिला नव्हता.पहिल्यांदा समुद्र पाहिला तेंव्हा तो अथांगसागर मी कितीतरी वेळ डोळ्यात साठवून ठेवत राहीलो होतो.मी मग्न होऊन समुद्र पहात राहिलो.बरोबरची सारी पुढं निघून गेली. समुद्राचं अप्रूप त्यांना नव्हतं.
"हा सागरी किनारा ... ओला सुगंध वारा. ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा... "असं काही गाणं मी ऐकत होतो. त्या गाण्यातला किनारा.. सागर.. ओला गंध होता.फक्त ओली मिठ्ठी नव्हती. रेशमी निवारा नव्हता. बरंच काही होतं नि बरंच काही नव्हतं ही. किना-यावर अनेक लोक मात्र ..त्या गाण्यातला सारं अनुभवत होते.ओली चिंब होत होती. काही माणसं.अपुरे कपडे घालून नाचत होती.हुंदडतं होती.दुस-याचं सुख पाहून ही आपण सुखाची छान कल्पना करू शकतो. तसचं माझं झालं होतं.मी कल्पना विश्वात,रममाण झालो होतो.
उसळणाऱ्या समुद्र भयाण वाटतो. भयाण अथांग तर तो असतोच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा