नाना,अजून तुम्ही हवे होता?
" मृत्यू सदैव माझ्या सोबत असतो.या जगात कुणी बरोबर राहिलं किंवा नाही,शेवटी तो प्रत्येकाला भेटतोच.मृत्यूला टाळू शकेल असं कुणीच नसतं." असं नाना नेहमी म्हणतं. Nana Patekar नाना पाटेकरांनाही शेवटी गाठलं त्यानी. खरतर जीवन हीच एक रंगभूमी असते. विधाता प्रत्येकाला एक भूमिका देतो. प्रत्येक जण वाट्याला आलेली ती भूमिका वठवतो, आपापल्या परीने. कुणी कंजूषी करत नाही. कसूरही करत नाही. जीव ओतून जो तो स्वतःला वठवत राहतो. सिद्ध करत राहतो. Nana Patekar कुणी दखल घेतं; कुणी नाही. एक दिवशी पडदा पडतो. अंक संपतो. काही भूमिका मनात खोलवर रुजत जातात. मनाच्या तळाशी शेवाळत राहतात. काळजाची सलगी असते ना त्यांची? नाना पाहिले चित्रपटात... नाना पाहिले पडद्यावर... नाटकात. नाना कधी भेटले नाहीत, पण फार अप्रूप होतं त्यांचं. Nana Patekar अभिनय असेल. स्पष्ट बोलणं असेल. समाजभान असेल. सामाजिक बांधिलकी असेल. या साऱ्या गोष्टींपेक्षा त्यांचं जगणं व जीवनविषयक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन मला जास्त भावला होता. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याचा छंद जडून घेतला होता त्यांनी. फाटक्या-तुटक्या शेतकऱ्यांच्या डोईवरचं फाटकं आभाळ शिवून देण्याचा विड...